शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती, सिडकोने उभारलेल्या गृहप्रल्पांचाही समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 23:34 IST

या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात ३३४ धोकादायक इमारती असल्याचे पालिकेने केलेल्या सर्व्हेत उघड झाले आहे. यासंदर्भात पालिकेने नुकताच सर्व्हे पूर्ण केला असून संबंधितांना नोटीस बजावली आहे. यामध्ये खारघरमध्ये सिडकोने १० वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार, सेलिब्रेशन या गृहसंकल्पातील २९ इमारती धोकादायक आहेत.महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५३, ५४, ५५ आणि ५६ मधील तरतुदीप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणे यांच्यावर कारवाईसाठी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पालिका क्षेत्रातील चार प्रभागांत प्रभारी प्रभाग अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात हा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेमध्ये सर्वाधिक १८३ धोकादायक बांधकामे प्रभाग क्रमांक ‘अ’मध्ये आहेत. प्रभाग ‘ब’मध्ये ६७, प्रभाग ‘क’मध्ये ४१ तर प्रभाग ‘ड’मध्ये ४३ धोकादायक बांधकामांचा समावेश आहे. धोकादायक इमारतींची संख्या मोठी असल्याने अशा इमारतींना स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना पालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या आहेत.खारघर शहरात सिडकोने १० वर्षांपूर्वी उभारलेल्या वास्तुविहार आणि सेलिब्रेशन गृहसंकल्पातील २९ इमारतींना पालिकेने धोकादायक ठरविले आहे. तत्काळ घरे खाली करण्याचा सूचना करण्यात आल्याने कोरोनाच्या काळात नेमके काय करावे, असा प्रश्न येथील रहिवाशांना पडला आहे. तीन दिवसांत या गृहप्रकल्पातील इमारतींना आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना केल्या असून, मुदतवाढ देण्याची विनंती येथील रहिवासी सोसायट्यांनी पालिकेकडे केली आहे.धोकादायक व अनधिकृत इमारतींना पालिकेने नोटिसा बजावल्या आहेत. संबंधितांना स्ट्रक्चरल आॅडिट रिपोर्ट सादर करण्याच्या सूचना करण्यात आलेल्या आहेत. सर्व कागदपत्रे पालिका प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर कारवाईबाबत पुढील निर्णय घेतला जाईल.- धैर्यशील जाधव, उपायुक्त, पनवेल महानगरपालिकादहा वर्षांत वास्तुविहार व सेलिब्रेशन या सिडकोने उभारलेल्या गृहप्रकल्पांना धोकादायक ठरविले जात असेल तर घरे खरेदी केलेल्या नागरिकांची ही फसवणूक आहे. निकृष्ट दर्जाचा माल वापरून ही घरे उभारली आहेत, हे सिद्ध होत आहे. - गणेश बनकर, उपाध्यक्ष, मनसे खारघर शहरपालिकेच्या नोटिशींनंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सध्या येथील देखरेख सिडकोच करीत असून सिडकोने याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी.- संजना समीर कदम,स्थानिक नगरसेविका, खारघर प्रभग क्रमांक ६

टॅग्स :cidcoसिडकोpanvelपनवेल