शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत ३२९४ गणेशमूर्तींचे झाले विसर्जन; कृत्रिम तलावांना नागरिकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2020 00:07 IST

कोपरखैरणे ठरला कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात पाचव्या दिवशी ३२६४ घरगुती आणि ३० सार्वजनिक अशा एकूण ३२९४ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन संपन्न झाले. महापालिकेच्या माध्यमातून साकारण्यात आलेल्या कृत्रिम तलावांना नागरिकांनी पसंती दिली असून कोपरखैरणे येथील कृत्रिम तलावांवर सर्वाधिक गणेश मूर्तींचे विसर्जन झाल्याने कोपरखैरणे कृत्रिम तलावांचा नवी मुंबई पॅटर्न ठरला आहे.

कोव्हीड १९च्या कालावधीत यावर्षीच्या श्रीगणेशोत्सवात नवी मुंबईकर नागरिकांनी शासन, प्रशासनाने केलेल्या आवाहनास अनुसरून स्वयंशिस्तीचे पालन करीत जागरूक व जबाबदार नागरिकत्वाचे सर्वच विसर्जन स्थळांवर दर्शन घडविले आहे. आपल्या घराजवळच्या कृत्रिम तलावांमध्ये श्रीमूर्ती विसर्जन करण्यास प्राधान्य देत नागरिकांनी सोशल डिस्टन्सींगच्या नियमांचे पालन केलेच. शिवाय पर्यावरणपूरक संदेशही स्वत:च्या कृतीतून दिला, कोपरखैरणे तलावाठिकाणी तर मुख्य विसर्जन तलावामध्ये केवळ ३ श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आल.१३५कृत्रिम तलावात १९९३ घरगुती तसेच २२ सार्वजनिक अशा एकूण २०१५ श्रीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेश विसर्जनाकरिता महानगरपालिका आठही विभाग कार्यालयांच्या वतीने संपूर्ण व्यवस्था नियोजनबध्दरित्या कार्यरत होती.विभागातील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह अग्निशमन विभाग आणि विसर्जनासाठी नियुक्त केलेले स्वयंसेवक, लाईफ गार्डसयांच्या माध्यमातून विसर्जन व्यवस्था सुरळीत पार पडली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस बंदोबस्त चोख होता.२२ विसर्जन स्थळांवर १२७१ घरगुती व ८ सार्वजनिक अशा एकूण १२७९ श्रीगणेशमुर्तींचे विसर्जन करण्यात आले. तात्पुरत्या स्वरूपात निर्मिती करण्यात आलेल्या एकूण १३५ कृत्रिम विसर्जन तलावांमध्ये १९९३ घरगुती व २२ सार्वजनिक अशा एकूण २०१५ श्रीगणेशमुर्तींना भावपूर्ण निरोप देण्यात आला.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव