शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामा हल्ल्याच्या नावाखाली उकळले ३२ लाख; गुन्ह्यात सहभागाची दाखवली भीती

By सूर्यकांत वाघमारे | Updated: May 20, 2024 19:14 IST

एनआरआय मधील वृद्ध व्यक्तीसोबत घडला प्रकार

नवी मुंबई : पुलवामा हल्ल्यात सहभाग असल्याचे सांगून कारवाईच्या नावाखाली वृद्ध व्यक्तीला धमकावून ३२ लाख रुपये उकळल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अज्ञात दोघांवर सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एनआरआय परिसरात राहणाऱ्या शरद पाटील (८२) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांना एका व्यक्तीने फोन करून पाटील यांचा पुलवामा हल्ल्यात सहभाग निष्पन्न झाले असल्याचे सांगितले. याशिवाय त्यांचा ड्रग्स तस्करीत देखील सहभाग असल्याने त्यांच्यावर शासकीय संस्थांमार्फत देशद्रोहाची कारवाई होणार असल्याची भीती दाखवण्यात आली.

त्याद्वारे कारवाई टाळण्यासाठी त्यांच्याकडून ३२ लाख रुपये उकलण्यात आले. हि रक्कम संबंधितांच्या सांगण्यावरून त्यांनी वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये पाठवली आहे. काही दिवसांनी त्यांनी या घटनेबाबत जवळच्या व्यक्तींकडे चर्चा केली असता आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यामुळे त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार केली असता अज्ञात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.