शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

तुर्भेमधून ४२ किलो गांजा जप्त; एका महिलेस अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2019 00:22 IST

अमलीपदार्थ विक्रेत्यांवर छापासत्र सुरूच

नवी मुंबई : नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अमलीपदार्थ विक्रेत्यांवरही छापासत्र सुरू केले आहे. खारघरमध्ये १५ लाख रूपये किमतीचे अमलीपदार्थ जप्त केल्यानंतर शुक्रवारी तुर्भेमधील अड्ड्यावर छापा टाकला. तेथून ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करून लक्ष्मी धुवार या महिलेस अटक केली आहे.नवी मुंबई अमलीपदार्थमुक्त करण्यासाठी पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. अमलीपदार्थविरोधी पथकासह सर्व पोलीस ठाण्यात कुठेही अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास येताच तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. परिमंडळ एक उपआयुक्तांनी यासाठी एक विशेष पथकही तयार केले आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी होणाऱ्या पार्ट्यांमध्ये अमलीपदार्थांचा वापर होण्याची शक्यता आहे. गांजासह इतर अमलीपदार्थांची शहरात विक्री होणार असल्याची शक्यता असल्यामुळे पोलीस यंत्रणा दक्ष झाली आहे. तुर्भे गाव सेक्टर २४मधील आयसीआयसीआय बँकेसमोरील रोडवर स्कायवॉकच्या जिन्याजवळ एक महिला गांजाविक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती अमलीपदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे शुक्रवारी सायंकाळी त्या ठिकाणी सापळा रचण्यात आला होता. सात वाजण्याच्या सुमारास तेथून लक्ष्मी धुवाला या महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडे ४२ किलो ९१० ग्रॅम गांजा सापडला आहे. याशिवाय ६०० रुपये रोख रक्कमही आढळली आहे. एकूण ८ लाख ५८ हजार रुपये किमतीचा ऐवज तिच्याकडून हस्तगत केला असून, तिच्याविरोधात एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अमलीपदार्थविरोधी पथकाने सलग दोन दिवस मोठी कारवाई केली आहे. गुरुवारी खारघरमधून केनिथ सिमन केझी व नामेनॉन डोझी इजिकेसिरिल या नायजेरीयन नागरिकांना अटक केली होती. त्यांच्याकडून ७ लाख रूपये किमतीच्या एम.डी.एम.ए.च्या १०० गोळ्या सापडल्या होत्या. याशिवाय २ लाख ६० हजार रुपये किमतीची एम्फेटामाइन पावडर व ५ लाख ३५ हजार रुपये किमतीची मॅसेक्लीन पावडर जप्त केली होती. एवढ्या मोठ्या प्रमाणात गोळ्या सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर पार्ट्यांमध्येही या गोळ्यांचे सेवन होण्याची शक्यता होती. पोलिसांच्या कारवाईचे शहरवासीयांकडूनही स्वागत होत आहे.नागरिकांनाही आवाहनअमलीपदार्थ विक्रेत्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. गांजासह इतर अमलीपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे सत्र सुरू आहे.शहरात कुठेही अमलीपदार्थांची विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास नागरिकांनीही पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.नायजेरीयन नागरिकांकडून ७ लाख रुपये किमतीच्या एम.डी.एम.ए.च्या १०० गोळ्या, तसेच २ लाख ६० हजार रुपये किमतीची एम्फेटामाइन पावडर व ५ लाख ३५ हजार रुपये किमतीची मॅसेक्लीन पावडर जप्त केली आहे.