शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहरातील २८ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 00:45 IST

पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.

पनवेल : पनवेल महानगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतींची संख्या २८च्या घरात पोहोचली आहे. पालिका प्रशासनाने जवळपास ४६ मोडकळीस आलेल्या इमारतींना नोटिसा बजावल्या असून, बांधकाम पाडण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. काही ठिकाणी मालक व भाडोत्रींमध्ये वाद आहे. त्यामुळे लोक जीव धोक्यात घालून राहात असल्याने पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.पनवेलमधील जुन्या वाड्यांची जागा इमारतींनी घेतली असली तरी आजही काही जुनी बांधकामे शहरात आहेत. काही इमारती, घरे मोडकळीस आली आहेत. संबंधित मालक आणि रहिवाशांबरोबर अनेकदा चर्चाही केल्या असून त्यांची समजूतही घालण्यात आली आहे. मात्र, मालक आणि भाडोत्री यांच्यातील वाद या गोष्टीचा अडथळा निर्माण करीत आहे. दोन दिवसांपूर्वी रोटरी सर्कलमधील अग्रवाल कॉम्प्लेक्सच्या सज्जाचा भाग कोसळल्याने पनवेल शहरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशीच परिस्थिती पालिका हद्दीतील इतर ठिकाणीसुद्धा असल्याने आजच्या घडीला काही धोकादायक इमारती खाली करण्यात आल्या नाहीत. सिडको हद्दीत नवीन पनवेल तसेच कळंबोली शहरात नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.संबंधित इमारतींचे स्ट्रक्चरल आॅडिटदेखील झाले आहे. पालिकेत समाविष्ट २३ ग्रामपंचायत हद्दीतदेखील मोठ्या प्रमाणात धोकादायक इमारतींचा समावेश आहे. पालिकेमार्फत अधिकृत आकडेवारी जाहीर झाली नसली तरी ही संख्या ३० च्या वर जाण्याची शक्यता आहे.धोकादायक इमारतींची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. संबंधितांना नोटिसा देखील बजावण्यात आल्या आहेत.- जमीर लेंगरेकर, उपायुक्त

टॅग्स :panvelपनवेल