शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
5
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
6
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
7
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
8
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
9
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
10
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
12
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
13
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
14
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
15
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
16
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
17
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
19
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया

एफडीएची २६ दुकानांवर धाड

By admin | Updated: October 26, 2015 01:02 IST

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे

पेण : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्साहावर विरजण पडू नये यासाठी एफडीएचे भरारी पथक सज्ज झाले असून भेसळयुक्त माव्यापासून बनविणाऱ्यांना या पथकाने चांगलाच दणका दिला आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार व वरिष्ठ कार्यालयाकडून पारित झालेल्या परिपत्रकानुसार रायगड युनिटच्या पेण येथील एफडीएच्या सहाय्यक आयुक्त व अन्न सुरक्षा अधिकारी वर्गाने रायगड जिल्ह्यातील २६ दुकानांवर छापे मारून ६९ अन्न नमुने तपासणीसाठी जप्त केल्याने मिठाई दुकानदार व अन्न पदार्थ विक्री व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.१ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत एफडीएची धडक मोहीम असून यासाठी भरारी पथके मिठाई विक्रेत्यांवर वॉच ठेवून आहेत. सर्वात मोठा सण असलेल्या दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माव्यापासून बनविलेली मिठाई मोठ्या प्रमाणावर भेट दिली जाते. यासाठी गल्लीबोळात हलवाई, मिठाई व जंकफूडची दुकाने थाटली जाऊ लागली आहेत. या दुकानातील अन्न पदार्थाची गुणवत्ता व भेसळीचे प्रमाण याबाबत सामान्य जनतेला काहीच माहिती नसते. अशावेळी सणांच्या काळात चढ्यादराने मिठाई व अन्नपदार्थांची विक्री करुन उखळ पांढरे करणाऱ्या विक्रेत्यांना एफडीएच्या पथकाचा चांगला दणका मिळणार आहे.दिवाळी सणात परराज्यातून येणारे पॅकिंग फूड, खवा, मावा, शीतपेय व इतर अन्न पदार्थांमध्ये भेसळीचे प्रमाण असते. शुध्दतेची गॅरंटी देणारे तेल, वनस्पती तूप, दूधजन्य पदार्थ, मसाले व इतर अन्नपदार्थ चांगले आकर्षक वेस्टन लावून विक्रीचा खप वाढविण्यावर भर असतो. या साऱ्यांनाच वेसण म्हणून अन्न सुरक्षा मानके कायद्याअंतर्गत अन्न नमुन्याची तपासणी करण्यासाठी एफडीएची धडक मोहीम आहे.पेण रायगड युनिटचे अन्न सुरक्षा अधिकारी यांनी जिल्ह्यात यासाठी धडक मोहीम हाती घेतली असून या पथकात सहाय्यक अन्न आयुक्त भ. ऊ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न निरीक्षक आर. एस. बोडके, ग. वि. जगताप, आर. पी. कुलकर्णी, बी. ए. बाळाजी, प्र. शि. पवार व सु. ना. जगताप यांनी २६ दुकानांवर धाडी टाकून ६९ अन्न नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविले आहेत. यापैकी काही नमुने तपासणी होवून आले आहेत. यातील माव्याचे नमुने अप्रमाणीत आल्याने अधिकारी सतर्क झालेत.तपासणीसाठी घेतलेल्या अन्न नमुन्यात तेलाचे २२, मिठाईचे २५, वनस्पती तूप १०, इतर अन्नपदार्थ ६, मसाले ४ व नमकीन पदार्थ २, दूधजन्य १ असा समावेश आहे.अन्न सुरक्षा मानके कायद्यानुसार, अन्न शिजविण्यासाठी आणि विकण्यासाठी एफडीएची नोंदणी परवाना असणे बंधनकारक आहे. मिठाई विक्रेत्याकडे परवाना आहे का? याचीही एफडीएचे पथक चौकशी तथा तपासणी करीत आहेत. नोंदणी परवाना नसलेल्या विक्रेत्यांना कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. मिठाई बनविणारे विक्रेते - कारागीर यांची शारीरिक तपासणी, फिटनेस सर्टिफिकेट, मिठाई बनविण्याची साधने, जागा, स्वच्छ आहे का? यामध्ये अन्न सुरक्षा मानके कायद्याचा भंग होता कामा नये. भंग झाल्यास कारवाई अटळ आहे. अशा सूचनाही एफडीएच्या पथकाकडून संबंधितांना देण्यात येत आहेत. मिठाई, ड्रायफूड व इतर अन्नपदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी योग्य ती काळजी घ्यावी आणि दिवाळी सणाचा आनंद उपभोगावा असे आवाहन अन्न सुरक्षा सहाय्यक आयुक्त भ. ऊ. पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)