शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पालिकेतील २६ अभियंत्याकडे व्यवसायिक पात्रताच नाही

By admin | Updated: November 26, 2015 01:42 IST

मीरा भार्इंदर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या २६ पैकी एकाही अभियंत्याने नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रच सादर केले

धीरज परब, मीरारोडमीरा भार्इंदर महापालिकेत कार्यरत असणाऱ्या २६ पैकी एकाही अभियंत्याने नियमानुसार आवश्यक असलेल्या व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्रच सादर केले नसल्याने शहर अभियंता, कार्यकारी अभियंता तथा उपअभियंत्यांना दिलेल्या वेतनवाढीत व पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर शासनाच्याच एका परिपत्रकाचा आधार घेऊन श्रेणीवाढ मागणाऱ्या २० कनिष्ठ अभियंत्यांना महासभेचा ठराव होऊनदेखील व्यावसायिक परीक्षा प्रमाणपत्रच नसल्याने श्रेणीवाढ मिळणे अवघड ठरणार आहे. अभियंत्यांना व्यावसायीक परिक्षा देणे बंधनकारक आहे. मात्र ती उत्तीर्ण होण्याकडे अभियंत्यांकडून सर्रास दुर्लक्ष केले जात असल्याने राज्य शासनाने ३० आॅगस्ट २००६ रोजी परिपत्रकावरून दिसते. यापत्रकानुसार कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांनी विहीत केलेली व्यावसायिक परीक्षा उत्तीर्ण केली नसेल तर त्यांची वेतन वाढ रोखण्यासह कालबद्ध पदोन्नती वा आश्वासित प्रगती योजनेवरील वेतनश्रेणी आणि वरिष्ठ पदावरच्या पदोन्नतीसाठी विचार करण्यात येऊ नये, असे शासनाने स्पष्ट केले होते. परिपत्रकाच्या दिनांकापासून ४ वर्षांच्या कालावधीत आणि ३ प्रयत्नांमध्ये परीक्षा उत्तीर्ण होण्याची संधीदेखील शासनाने दिली होती. परंतु, ज्या कर्मचाऱ्यांचे वय ४५ वर्षे पूर्ण होईल त्यांना त्या दिनांकापासून सदर परिक्षेतून सूट देऊन उक्त लाभ देण्यास शासनाने मंजुरी दिली होती. जुलै २०१३ मध्येदेखील प्रशासनाच्या पडताळणीत शहर अभियंता शिवाजी बारकुंड, कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे व दीपक खांबित, उपअभियंता शरद नानेगावकर, किरण राठोड, नितीन मुकणे सह २१ कनिष्ठ अभियंते व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झालेच नसल्याचे स्पष्ट झाले होते. तरीदेखील संबंधित अभियंत्यांना लेखी पत्र द्यावे व विहीत मुदती नंतर सुद्धा प्रमाणपत्र सादर न करणाऱ्यांवर शासन परिपत्रकानुसार कारवाई करावी, असे उपायुक्त मुख्यालय यांनी स्पष्ट केले होते. अभियंत्यांकडे वजनदार खाती असल्याने पुढे त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. दुसरीकडे कनिष्ठ अभियंते मात्र पाटबंधारे विभागाच्या एका निर्णयाचा आधार घेऊन ५ वर्ष सेवा पूर्ण झाल्याने वर्ग २ च्या शाखा अभियंता म्हणून श्रेणीवाढ देण्याची मागणी २००८ साला पासून महापालिके कडे करत होते. २२ जुलै २०१५ रोजी झालेल्या महासभेत तसा प्रस्ताव खुद्द आयुक्त अच्युत हांगे यांनीच आणला होता. महासभेने देखील त्यास मंजुरी दिली होती. व्यावसायिक परिक्षाच उत्तीर्ण नसल्याने श्रेणीवाढ देणे बेकायदेशीर ठरणार असले तरी महासभेचा ठराव शासना कडे मंजुरीसाठी पाठवण्याची धडपड सुरु होती. मात्र ३० आॅक्टोबर रोजी आयुक्तांनी सर्व संबंधित अभियंत्यांना परिपत्रक काढून ३ दिवसात व्यावसायिक परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. अपेक्षे प्रमाणे एकाही अभियंत्याने ते सादर केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले.