शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मद्यपींसाठी २५ हजार प्रवाशांना धरले वेठीस

By admin | Updated: September 14, 2016 04:50 IST

नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात

नामदेव मोरे , नवी मुंबई नेरूळ रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला प्रवेशद्वारावरच मद्यपींचा अड्डा सुरू आहे. येथील दारू विक्रीच्या दुकानाबाहेर रोज ५०० ते ६०० जण मद्यपान करत असतात. अनेक वेळा महिला प्रवाशांची छेड काढण्याचे प्रकारही घडू लागले आहेत. दारू विकणारे व पिणाऱ्यांना पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन पाठीशी घालत असल्यामुळे प्रवाशांमध्ये तीव्र असंतोष निर्माण होऊ लागला आहे. नवी मुंबईमधील सर्वाधिक गर्दी असणाऱ्या रेल्वे स्टेशनमध्ये नेरूळचाही समावेश होतो. नेरूळ पश्चिमेला माथाडी कामगार व अल्प उत्पन्न गटातील नागरिकांची वस्ती आहे. येथील जवळपास १ लाख नागरिक रोज रेल्वेने ये -जा करत असतात. रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच सिडकोने मद्यविक्री करणाऱ्यांना दुकानाची विक्री केली आहे. जवळपास एक वर्षापासून येथे खुलेआम मद्यपान सुरू आहे. दारू दुकानदाराने येथे मद्यपान करण्यास मनाई असल्याचा फलक लावला आहे. परंतु तो फक्त औपचारीकता म्हणून. येथे दारू विकणाऱ्यांना सोडा, पाणी पुरविण्यासाठी एकास जागा भाडेतत्वावर दिली आहे. चकण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळतील याची सोय केली आहे. दारू पिण्यासाठी ग्लास उपलब्ध करून दिले जात आहेत. सायंकाळी ६ ते रात्री ११ पाच तासामध्ये तब्बत ५०० ते ६०० जण येथे मद्यपान करत आहेत. गुंड प्रवृत्तीचे काही तरूण रेल्वेतून प्रवासी बाहेर येवू लागले की प्रवेशद्वारावर उभे राहतात व प्रवाशांसमोर दारू पितात. कोणी या तरूणांना हटकण्याचा प्रयत्न केल्यास त्यांना मारहाण केली जात आहे. येथील जिन्यांपासून मोकळ्या जागेवरही तळीरामांनी बस्तान मांडलेले चित्र दिसू लागले आहे.नेरूळ स्टेशनच्या पश्चिमेला सायंकाळी ६ ते ११ दरम्यान जवळपास २५ हजार प्रवाशी येत असतात. यामध्ये ८ ते १० हजार महिलांचा समावेश आहे. अनेक टपोरी तरूण दारू पिऊन महिलांची छेड काढत आहेत. महिलांकडे पाहून शेरेबाजी करत आहेत. यामुळे अनेक महिलांनी या प्रवेशद्वाराकडून येण्याचे बंद केले आहे. एक वर्षापासून सुरू असलेल्या या अवैध प्रकाराकडे पोलीस, रेल्वे व सिडको प्रशासन दुर्लक्ष करत आहे. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाच तास येथे उभे राहून पाहणी केली असता रोज दोन गोणी भरून बाटल्या व ग्लास जमा होत आहेत. रात्री ११ नंतर यामधील बाटल्या भंगारवाला घेऊन जातो. दारूच्या दुकानासमोरील सिडकोच्या केबीनमध्येही अतिक्रमण झाले आहे. तेथे कचऱ्याचे डबे ठेवण्याचे गोदाम तयार केले आहे. यापुर्वी अनेक प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व पोलिसांकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु काहीच कारवाई होत नसल्याने प्रवाशांमध्ये विशेषत: महिलांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.कायदा हातात घ्यावा लागेलस्थानकात सुरू असलेल्या मद्यपानाविषयी कोणीही गांभीर्याने लक्ष देत नाही. महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. महिलांची छेड काढली जात आहे. पोलीस येथील मद्य विक्री व मद्यपान थांबविणार नसतील तर आम्हाला कायदा हातात घेऊन हे प्रकार थांबवावे लागतील असा इशारा महिलांनी दिला आहे. महिलांच्या असंतोषाचा उद्रेक झाल्यानंतरच कारवाई करणार का असा प्रश्न महिलांनी उपस्थित केला आहे. पाच तासात दोन गोणी बाटल्या जमानेरूळ परिसरातील सामाजीक कार्यकर्त्यांनी रेल्वे स्टेशनमधील अनधिकृत ओपन बारचे वास्तव सर्वांसमोर मांडण्यासाठी सायंकाळी ६ ते रात्री ११ पर्यंत येथील परिस्थितीचे सर्वेक्षण केले. रोज दोन गोणी बाटल्या जमा होत असल्याचे निदर्शनास आले आहे. येथील पायऱ्या व बाजूच्या दुकानांजवळही मद्यपींच्या मैफिली सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. मद्यपींसाठी सोडा, ग्लास, पाणी पुरविले जात आहेत. पानटपरीही सुरू झाली असल्याचे निदर्शनास आले. येथूनच अनेक वेळा पोलीस व सुरक्षा रक्षकत जात असतात परंतु ते बघ्याची भूमिका घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे.