ठाणे : मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून पाच जणांच्या टोळक्याने २५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार टिकुजिनीवाडी भागात घडला. याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.बोरिवलीतील रहिवासी जोसेफ परेरा यांची पत्नी आजारी असल्याचा गैरफायदा घेऊन राजेंद्र घाग आणि त्यांचे साथीदार संतोष साहू, राम राऊत, पर्वत पांडा आणि दामोदर बेहरा यांनी त्यांच्या मायक्रो लिझिंग अॅण्ड फंडिंग लिमिटेड या कंपनीत २५ लाख रुपये गुंतविण्यास सांगून त्यापोटी चांगले व्याज देण्याचे आमिष दाखविले. मोठी रक्कम हाती मिळेल, या आशेपोटी परेरा यांनी ३० जुलै २०१५ ते २९ सप्टेंबर २०१५ या कालावधीत त्यांच्याकडे गुंतविली. मात्र, त्यांची फिक्स्ड गुंतवणूक न करता ते फ्लोटिंग फंडात गुंतविले. त्यापोटी जमा रक्कम आणि व्याज परत न केल्यामुळे या प्रकरणी त्यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक डी.बी. मुकणे हे याप्रकरणी तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
मोठ्या व्याजाचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक
By admin | Updated: October 1, 2015 23:27 IST