शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
2
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
3
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
4
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
5
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
6
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
7
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
8
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलीबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
9
स्मरण दिन: नियमितपणे श्री शंकर महाराजांची बावन्नी म्हणा, शुभ पुण्य फल मिळवा; जय शंकर!
10
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
11
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
12
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
13
प्रार्थना बेहेरेच्या घरी आला नवा पाहुणा, नावही आहे खूपच ट्रेडिंग; नवऱ्याला वचन देत म्हणाली...
14
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
15
Jasprit Bumrah: आयपीएलदरम्यान जसप्रीत बुमराहनं पत्नी संजनाला नेलं डेटवर, शेअर केला खास फोटो
16
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
17
Dewald Brevis DRS: डेवॉल्ड ब्रेव्हिसच्या विकेटवरून गोंधळ, आरसीबी- सीएसकेच्या समर्थकांमध्ये तूतू-मैमै!
18
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
20
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच

उरण दंगलीप्रकरणी २५ अटकेत

By admin | Updated: January 20, 2015 02:05 IST

रविवारी पोलीस आणि कंटेनर चालकांमध्ये पेटलेल्या दंगलीप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी २५ चालक क्लीनर्सना अटक केली आहे.

उरण : रविवारी पोलीस आणि कंटेनर चालकांमध्ये पेटलेल्या दंगलीप्रकरणी न्हावा-शेवा पोलिसांनी २५ चालक क्लीनर्सना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सोमवारी न्हावा-शेवा पोलिसांनी करळ ते जीटीआय, जेएनपीटी, डीपी. वर्ल्ड या तिन्ही बंदरांकडे जाणारी वाहने हटवून कंटेनर वाहतूक सुरळीत केली. ही माहिती साहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत बोराटे यांनी दिली. ट्रेलरचालक आणि न्हावा-शेवा पोलीस यांच्यात रविवारी पेटलेल्या संघर्षामुळे दंगल माजली होती. या दंगलीत पोलिसांची जीप आणि चौकीला संतप्त जमावाने आग लावली. त्यांच्याविरोधात सार्वजनिक मालमत्तेचे नुकसानअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोर्ट युजर्स बिल्डिंग परिसरातील सीसीटीव्ही फुटेज मागविण्यात आले आहे. ट्रेलरच्या मालकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदराचे एसीपी शशिकांत बोराटे यांनी दिली. २५ जणांना अटकयाप्रकरणी उपनिरिक्षक आर. एस. संदानशिव यांनी फिर्याद नोंदवून दंगलीत १७ लाखांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. न्हावा-शेवा पोलिसांनी मोहंमद इकरार अब्दील कुडूस, नरससिंग रामस्वरूप, बिट्टू दास, इरफान अली महमद अन्सारी, संजयकुमार श्रीराम सिंग, अजयकुमार प्रजापती, हेमंतकुमार राजभर, जितेंद्र कोडग, अनिल यादव, दुर्गाप्रसाद यादव, राहुल यादव, साईनाथ गोरडवार, अमरजित यादव, तानाजी नरळे, महंमद तोहीर मोहंमद तय्यब, राधेश्याम यादव, रामसिंग गौड, कबीरसेन गिर, विनोद यादव, विकास परदेशी, रामचंद्र रेडेकर, खालीद शकील अहमद, नरेंद्रसिंग दशरथसिंग, अनंतसिंग संतोषसिंग, राजकरणसिंग वीरेनसिंग आदी २५ चालक, क्लीनरना अटक केली आहे.