शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

२३० आशासेविकांना मिळणार विमा कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:57 IST

केंद्र शासनाची मान्यता; प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नागरी आरोग्य केंद्रात काम करणाऱ्या २३० आशासेविकांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजना लागू करण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत विमा कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाची मान्यता मिळाली असून, योजना राबविण्याची कार्यवाही करण्याचे राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेला सूचित करण्यात आले आहे.

आशासेविकांना विमा कवच देण्याच्या अनुषंगाने प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना व प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचे सुरक्षा कवच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी वयाची मर्यादा १८ ते ५० असणे अनिवार्य आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या व्यक्तिंचा कोणत्याही प्रकारचा मृत्यू झाल्यास वारसदाराला २ लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी दरवर्षी ३३० रुपये इतकी रक्कम भरावी लागणार आहे. प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ घेणाऱ्या पॉलिसीधारकाचे वय १८ ते ७० वर्षापर्यंत असावे लागेल. या योजनेसाठी १२ रुपये वार्षिक भरावे लागणार असून, अपघाती मृत्यू झाल्यास वारसदारास २ लाख रुपये तसेच अपघातामुळे अपंगत्व आल्यास १ लाख रुपये मिळणार आहेत. 

७७ हजार भरणारनागरी आरोग्य केंद्रांमध्ये २३० आशासेविकांच्या विम्याचे हप्ते पालिकेने भरावेत, असे सूचित  केले आहे. त्यानुसार सर्व आशासेविकांच्या विम्याच्या हप्त्यापोटी पालिका सुमारे ७७ हजार रुपये दरवर्षी भरणार आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई