शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांसाठी २,२११ विशेष बस

By admin | Updated: August 17, 2016 03:10 IST

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायांचे आगमन अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपले आहे.

जयंत धुळप, अलिबागसंपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विघ्नहर्ता गणरायांचे आगमन अवघ्या २० दिवसांवर येऊन ठेपले आहे. यंदाही चाकरमान्यांना गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या गंभीर व धोकादायक दुरवस्थेचे विघ्न पार करूनच कोकणातील आपल्या घरी पोहोचावे लागणार आहे. गणेशभक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाची राज्य परिवहन मंडळाने तब्बल २ हजार २११ जादा एसटी बसेसची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रायगड (रामवाडी) एसटी विभागीय कार्यालयातील वाहतूक निरीक्षक संजय हर्डीकर यांनी दिली. येत्या १ ते ५ सप्टेंबरदरम्यान मुंबई सेंट्रल, बोरीवली, परळ, ठाणे आदी ठिकाणांहून सुटणाऱ्या या २ हजार २११ विशेष एसटी बसेसचे आगाऊ आरक्षण सुरू झाले आहे. यापैकी ६० टक्केहून अधिक बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे. दरम्यान, गणेशोत्सवांती परतीच्या प्रवासाकरिता रायगड (रामवाडी) एसटी विभागातून ११ व १२ सप्टेंबर रोजी १९८ एसटींची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही हर्डीकर यांनी सांगितले. मुरूड एसटी आगारातून यंदा १३६ परतीच्या प्रवासाच्या बस फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे. या बसचे आगाऊ आरक्षण महिनाभर आधीच उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती मुरूड आगाराचे प्रमुख तेजस गायकवाड यांनी दिली.