शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना विभागाने संकलीत केला गतवर्षीपेक्षा 209 कोटी अधिक महसूल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2023 15:39 IST

नगररचना विभागास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 200 कोटी रक्कमेचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी मुंबई:    महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार अंदाजपत्रकात दिलेले वसुलीचे उद्दिष्ट साध्य करण्यात प्रशासनाला यश आले आहे. मालमत्ता कर विभागाने  मागील वर्षी पेक्षा 107 कोटी 17 लक्ष अधिकचे विक्रमी उत्पन्न प्राप्त केले. त्याचप्रमाणे नगररचना विभागानेही विविध अडथळ्यांवर मात करीत विकासशुल्कापोटी मागील वर्षीपेक्षा 209.18 कोटी अधिक उत्पन्न मिळवून इतिहास घडविला आहे.

      नगररचना विभागास सन 2022-23 या आर्थिक वर्षात 200 कोटी रक्कमेचे सुधारित उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने आयुक्तांच्या मार्गदर्शनानुसार, सहाय्यक संचालक नगररचना  सोमनाथ केकाण यांच्या नियंत्रणाखाली नगररचना विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी विशेष प्रयत्न करीत ऑनलाईन बांधकाम प्रणालीतील अडचणी तसेच विकास योजनेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या न्यायालयीन बाबी यावर मात करीत हे उद्दिष्ट गाठलेले आहे.

      कोरोना प्रभावीत कालखंडात 2020 पासून शहरातील विकास कामांची गती अतिशय मंदावलेली होती. मागील 2 आर्थिक वर्षात नगररचना शुल्कातून अत्यल्प उत्पन्न प्राप्त झाले होते. सन 2020-21 या आर्थिक वर्षात  95 कोटी उद्दिष्टापैकी 58.92 कोटी इतकी वसूली झाली होती. त्याचप्रमाणे पुढील 2021-22 या आर्थिक वर्षात 100 कोटी उद्दिष्टापैकी 57.63 कोटी इतकीच वसूली झाली होती. तथापी यावर्षी कोरोनाचा प्रभाव काहीसा कमी झाल्यानंतर विकास प्रक्रियेला गती देण्यासाठी नगररचना विभागामार्फत विशेष प्रयत्न करण्यात आले.

      सन 2022-23 या आर्थिक वर्षात शेवटच्या मार्च महिन्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नात लक्षणीय भर पडलेली असून माहे मार्च मध्ये 109.65 कोटी इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे. यामध्ये विशेष म्हणजे 31 मार्च या आर्थिक वर्षाच्या अखेरच्या दिवशी एका दिवसात 62.66 कोटी इतकी रक्कम विकास शुल्क अधिकमूल्य पोटी वसूल करण्यात आलेली आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा 66.81 कोटी अधिक उत्पन्न मिळवित नगररचना विभागाने आत्तापर्यंतचे रेकॉर्ड ब्रेक उत्पन्न मिळविलेले आहे. विकास योजनेच्या हरकती व सूचनांच्या सुनावणीचा कार्यक्रम मार्च महिन्यातच नियोजित करूनही नगररचना विभागाने सुट्टी न घेता सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरु ठेवून सदरचे उद्दिष्ट गाठले आहे.

      नवी मुंबई महानगरपालिका विकास योजनेच्या अनुषंगाने सुरु असलेल्या न्यायालयीन लढाईत तसेच विकास योजनेतील अढथळ्यांवर मात करीत उद्दिष्टापेक्षा अधिक वसूली करण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करण्यात आले. यामध्ये वाशी, कोपरखैरणे व बेलापूर येथील पुनर्विकासाच्या प्रस्तावांना जानेवारी ते मार्च दरम्यान परवानगी मंजूर करण्यात आली. खाजगी इमारतींच्या पुनर्विकासाकरिता देखील नवी मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेऊन मंजूर एकत्रिकृत विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीचा अवलंब करण्यात येत असलेल्या अडचणी सोडविण्याकरिता नगररचना विभागामार्फत शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात आला. याकरिता महापालिका आयुक्त श्री. राजेश नार्वेकर यांनीही व्यक्तीश: पुढाकार घेतला व शासन स्तरावर पाठपुरावा केला. त्यामुळे ही बाब शक्य झाली.

      मालमत्ताकर विभागाप्रमाणेच नगररचना विभागाने उद्दिष्टापेक्षा अधिक वसूली करीत 133.40 टक्के वसूली या आर्थिक वर्षात केलेली असून 266.81 कोटी इतकी रक्कम विकास शुल्कापोटी वसूल केलेली आहे. ही रक्कम मागील वर्षीपेक्षा 209.18 कोटीने अधिक असून नगररचना विभागाने प्राप्त केलेल्या या यशस्वी महसूलाबद्दल महापालिका आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी सहाय्यक संचालक नगररचना  सोमनाथ केकाण व त्यांच्या नगररचना विभागातील सहकारी अधिकारी, कर्मचा-यांची चांगल्या कामाबद्दल प्रशंसा केली आहे.

      यामुळे मागील काही वर्षांपासून मंदावलेल्या पुनर्विकासाच्या प्रक्रियेला चालना मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करीत नमुंमपा आयुक्त  राजेश नार्वेकर यांनी संबंधित घटकांचे व नागरिकांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका