शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल शहरातील १० कोटींची विकासकामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:58 IST

नगरसेवकाच्या उपोषणाची सिडकोने घेतली दखल

पनवेल : कळंबोली सिडको वसाहतीमधील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी नगरसेवक रवींद्र भगत यांनी उपोषणाचे हत्यार उगारले होते. शहरातील विविध विकासकामांबाबत सिडकोची उदासीनता पाहून नगरसेवक रवींद्र भगत हे सिडको विरोधात उपोषणाला बसले होते. हे उपोषण मागे घेताना सिडकोने विविध आश्वासने भगत यांना दिली होती. त्याअंतर्गत दहा कोटींची कामे कळंबोलीत सिडको करणार आहे.पनवेल महापालिका आणि सिडको यांनी एकत्रित केलेल्या सर्वेक्षणानुसार भगत यांनी मागणी केलेल्या विकासकामांची सुरुवात सिडकोने केली आहे. या संदर्भात सिडकोने भगत यांना लेखी पत्र दिले आहे. सिडको वसाहत असलेल्या कळंबोलीत मोठी गटारे बंदिस्त करणे, क्रिकेट मैदानाला स्टेडियम स्वरूपात बांधणी करणे, वन परिसरातील गटारे बंदिस्त करणे, तळमजल्यावरील नागरिकांच्या घरात घुसणाºया मलनि:सारण पाण्याचे नियोजन करणे आदी विविध मागण्यांसाठी कळंबोलीतील शेकापचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी सहा महिन्यांपूर्वी सिडकोविरोधात उपोषण केले होते. विविध १७ मागण्यांपैकी काही मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले होते. सहा महिन्यांपूर्वी दिलेले लेखी आश्वासन सिडको पाळत नसल्याने भगत यांनी पुन्हा सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांना पत्र लिहून सिडकोविरोधात पुन्हा आंदोलन करण्याचा इशारा दिला. ५ आॅगस्ट रोजी सिडकोविरोधात उपोषणाला बसण्याचा निर्धार केला होता. या पत्राची दखल घेत सिडकोचे कळंबोलीमधील कार्यकारी अभियंता गिरीश रघुवंशी यांनी भगत यांच्या मागण्या मान्य करून विकासकामांना सुरुवात करण्यात आल्याचे त्यांना कळविले. पनवेल महापालिका आणि सिडकोने एकत्रित केलेल्या सर्वेक्षणानुसार दहा कोटी १७ लाख रुपयांच्या निविदाही प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती पत्राद्वारे भगत यांना दिली.सिडकोने विकासकामांसाठी केलेली तरतूद लवकर पूर्ण करावी. सिडकोने दिलेले आश्वासन पाळण्यासाठी सिडको प्रशासनाला वारंवार त्यांच्याच कामांची आठवण करून द्यावी लागते, ही शोकांतिका असल्याचे भगत यांनी सांगितले. सिडको नोड पालिकेकडे हस्तांतर करण्याची आवश्यकता आहे. हस्तांतराच्या कचाट्यामुळे नागरिकांचे हाल होत असल्याचे नगरसेवक रवींद्र भगत यांनी सांगितले.

टॅग्स :cidcoसिडको