शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
3
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
4
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
5
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
6
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
7
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
8
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
9
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
10
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
11
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
12
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
13
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
15
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
16
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
17
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
18
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?
19
IPL 2025: वैभव सूर्यवंशीकडे आहेत 'इतक्या' बॅट; आकडा ऐकून नितीश राणा झाला शॉक, पाहा व्हिडीओ
20
"दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्यांना सोडणार नाही"; पहलगाम हल्ल्यावरुन PM मोदींची मोठी घोषणा

पनवेलमध्ये १८६ गुन्हे निकाली

By admin | Updated: January 22, 2015 23:58 IST

पनवेल विभागातील गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या फाईलचा निपटारा करण्यात आला आहे.

कामोठे : पनवेल विभागातील गेल्या सहा ते सात वर्षांपासून प्रलंबित असलेल्या गुन्ह्यांच्या फाईलचा निपटारा करण्यात आला आहे. त्याचबरोबर सहा महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास लावून त्यातील आरोपी आणि मुद्देमाल सहाय्यक पोलीस आयुक्तांनी हस्तगत केला आहे. यामध्ये तपास अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.पनवेल, नवीन पनवेल, खांदेश्वर, कामोठे, कळंबोली, तळोजा आणि खारघर हे पोलीस ठाणे येतात. या भागातून पनवेल-सायन, मुंबई- पुणे, मुंबई-गोवा, एनएच४बी आणि द्रुतगती महामार्ग जातात. त्याचबरोबर स्टील मार्केट, सिडको वसाहतींचा समावेश होतो. वाढते नागरीकरण आणि दळणवळणाबरोबर या भागातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेलमध्ये घरफोड्या, सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर अपहरण, खून, दरोडे, जबरी चोरी, बँक आणि व्यक्तींच्या फसवणुकीच्या घटनाही नित्याच्याच आहेत. यातील काही गुन्हे अतिशय गुंतागुंतीचे असल्याने त्याचबरोबर आरोपी न सापडणे, साक्षीदार न मिळणे या अनेक कारणांमुळे त्याची उकल करण्यास पोलिसांना अपयश येते. तसेच बेवारस मृतदेहाची ओळख न पटणे, त्यांचे नातेवाईक न मिळाल्याने तीही प्रकरणे प्रलंबित राहतात. पनवेल विभागात २००८ ते २०१२ या काळातील एकूण १८६ गुन्ह्यांचा तपास अपूर्ण होता. परिणामी या फाईली निर्णयाच्या प्रतीक्षेत होत्या. पनवेल विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शेषराव सूर्यवंशी यांनी पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर या सर्व प्रकरणांची छाननी सुरू केली आणि डिसेंबर २०१४ अखेर पनवेल विभागातील १६७५ केसचा निपटारा करण्यात आला. त्यामध्ये प्रलंबित १८६ केसचा समावेश होता. त्यामुळे इतके वर्ष धूळखात पडलेल्या फाईल्स आता बंद झाल्या आहेत. शेषराव सूर्यवंशी यांनी प्रलंबित असलेल्या सहा गुन्ह्यांचा स्वत: तपास करून आरोपी पकडले आहेत. १नागोठणे : वासगाव येथील धर्मा कोकरे या तरु णाचा गतवर्षी २८ फेब्रुवारीला खून करून मृतदेह महामार्गालगत टाकण्यात आला होता. आणि हा खून नसून अपघात असल्याचे भासविण्यात आले होते. याप्रकरणी नागोठणे पोलिसांनी एका आरोपीला अटक केली होती.मात्र मुख्य आरोपी कोंडीराम आखाडे,रा. वासगाव हा पळून जाण्यात यशस्वी झाला होता. खुनात सहभागी असलेला किरण पवार या तिसऱ्या आरोपीलाही कोंडीरामने दिलेल्या जबानीनंतर अटक करण्यात आली आहे. पैशाच्या व्यवहारातून कोंडीरामने आपल्या साथीदारांसह धर्मा कोकरेचा काटा काढला. २ पैशाच्या व्यवहारावरून गतवर्षी कोंडीरामने त्याच्या साथीदारांसह वासगाव येथील धर्मा कोकरे या तरु णाचा खून केला.यातील एक आरोपी सचिन पाटील याला पकडण्यात आले होते, तर मुख्य आरोपी कोंडीराम आखाडे, रा. वासगाव हा पसार झाला होता. या आरोपींनी त्याला २८ फेब्रुवारीला सायंकाळच्या दरम्यान वासगावच्या जंगलात मारले व १ मार्चच्या मध्यरात्री त्याचे प्रेत महामार्गावर आणून टाकले होते.कोंडीराम तेथून पळाल्यानंतर काही दिवस तो उद्धर रामेश्वरच्या जंगलात राहिला व त्यानंतर तो कर्नाटकात बंगळूर, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर तसेच बदलापूर येथे राहिला होता. ३कोंडीराम आपल्या घरी येणार याची कुणकुण लागल्यानंतर पोलीस पथक कामाला लागले. दोन दिवसांपूर्वी कोंडीराम बदलापूरहून पेण तालुक्यातील वाक्रुळ येथे आला व तेथून सुधागड ( पाली ) तालुक्यातील महागावपर्यंत चालत आला. सायंकाळी महागावजवळील एका चहाच्या टपरीवर थांबला असता पोलिसांनी त्याला पाहिले. त्याने शेजारील वसुधा फार्म हाऊसच्या कुंपणावरून उडी मारून जंगलात पसार होण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला जेरबंद केले.