शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

हेटवणे धरणात १८ हजार एमएलडी पाणी साठा पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 05:43 IST

हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले

अरुणकुमार मेहत्रे कळंबोली : हेटवणे धरणात सिडकोच्या आरक्षित पाण्यापैकी सुमारे १८ हजार एमएलडी पाणी साठा शिल्लक राहत असल्याचे माहितीच्या अधिकाराखाली कळंबोली येथील आत्माराम पाटील यांनी उघड केले आहे. मुबलक पाणी असूनही केवळ व्यवस्था नसल्याने सिडको वसाहतींना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचबरोबर एमजेपी आणि नवी मुंबई महापालिकेवर अवलंबून राहावे लागत आहे. त्यांच्याकडून होणाऱ्या अनियमित, अपुºया पाणीपुरवठ्यावर सिडकोला वसाहतींची तहान भागावी लागत आहे.पेण परिसरात ८६.३५ कोटी रुपये खर्च करून पाटबंधारे विभागाने सिडकोच्या सहकार्याने हेटवणे धरण बांधले. याकरिता सिडको प्रशासनाने ४७ कोटी रुपये खर्च केले असून त्या बदल्यात पाटबंधारे विभागाने सिडकोला पाणी देण्याचा करार केला आहे. हेटवणे धरणाची पाणी साठवण्याची क्षमता १४७.४९ द.ल.घ.मी. इतकी आहे. त्यापैकी १४४.९८ द.ल.घ.मी. इतका पाणी साठा उपयुक्त आहे. हेटवणे धरणातील पाणी साठ्यापैकी सिडको प्रशासन तसेच सिंचन याकरिता पाणी विभाजन करार करण्यात आला. त्यामध्ये १०० एमएलडी पाणी सिडकोला देण्याची अट ठेवण्यात आली होती. हा करारनामा बदलून पाणी कोटा ५० ने वाढून तो १५० एमएलडी करण्यात आला आहे. त्यामुळे धरणात सिडकोकरिता आरक्षित पाणी मोठ्या प्रमाणात असून त्याचा वापर होत नाही.सिडकोने या ठिकाणाहून जलवाहिनी पूर्वीच टाकली असून तिची क्षमता अतिशय कमी असल्याने आवश्यक पाणी सिडको वसाहतींना देताच येत नाही. त्याचबरोबर पंपिंगची क्षमताही अत्यल्प आहे. त्यामुळे येणारे पाणी कमी दाबाने येते. सिडको प्रशासनाने हेटवणे धरणातील पाणीपुरवठ्यासाठी योग्य उपाययोजना केल्यास अनेक वसाहतींतील पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली लागण्याची शक्यता आहे.सिडकोला दरवर्षी ५४,७५० इतके पाणी आरक्षित करण्यात आले आहे. त्यापैकी सिडको वर्षाला फक्त ३६,५०० एमएलडी पाणीच वापरते. म्हणजे १८,२५० एमएलडी पाणी धरणात शिल्लक राहते. आता आणखी पन्नास एमएलडी इतका कोटा वाढला आहे. सिडको वसाहतीला दररोज २१६ एमएलडी पाण्याची गरज आहे. पाणी कमी पडते याचे कारण म्हणजे पंपिंग क्षमता कमी आहे. त्याचबरोबर ते पाणी उचलण्याकरिता कोणतीच व्यवस्था नाही. आम्ही केलेल्या मागणीनुसार त्यांनी हेटवणे कळंबोली ग्रीडचे काम हाती घेतले आहे.- आत्माराम पाटील, सामाजिक कार्यकर्तेकळंबोलीहेटवणे-कळंबोली ग्रीडचे काम रखडले आहे ही वस्तुस्थिती आहे. संबंधित विभागाकडे पुन्हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. तांत्रिक अडथळे दूर झाल्यानंतर उरलेले काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे हेटवणे धरणातील पाणी सिडको वसाहतींना थेट देता येईल. एमजेपी आणि नवी मुंबई महानगरपालिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. - दिलीप बोकाडे, कार्यकारी अभियंतापाणीपुरवठा विभाग, सिडको.