शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यावर होणार १८ कोटींचा खर्च

By admin | Updated: November 16, 2015 02:13 IST

अंबरनाथ नगरपरिषदेत सध्या सुरू असलेल्या घंटागाड्या या नियमाला अनुसरून सुरू नसल्याने आणि या ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने नवा ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत

पंकज पाटील,  अंबरनाथअंबरनाथ नगरपरिषदेत सध्या सुरू असलेल्या घंटागाड्या या नियमाला अनुसरून सुरू नसल्याने आणि या ठेकेदाराची मुदत संपल्याने पालिकेने नवा ठेकेदार नेमण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. या निविदांमध्ये घनकचरा व्यवस्थापनाच्या नियमांना अधिन राहून कचरा संकलित करण्यात येणार आहे. तसेच ओल्या कचऱ्यावर प्रक्रियादेखील करण्यात येणार आहे. या सर्व प्रकल्पासाठी पालिका वर्षाकाठी १८ कोटी ३५ लाखांचा खर्च करण्याच्या तयारीत आहे. या निविदांमध्ये प्रत्येक प्रभागात ७ सफाई कामगार ठेकेदारी पद्धतीने पुरविण्यात येणार आहेत. अंबरनाथ पालिकेत प्रथमच स्वच्छतेवर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात येत आहे. अंबरनाथ नगरपरिषदेचे कचरा संकलन करण्याचे काम हे पनवेलकर या कंपनीला देण्यात आले होते. वर्षाला २ कोटी रुपये कचरा संकलनासाठी या कंपनीला अदा करण्यात येत होते. शहरातील सर्व कचरा संकलित करून तो डम्पिंग ग्राउंडवर टाकण्यात येत होता. मात्र, या कचऱ्याचे वर्गीकरण करण्याची आणि ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची कोणतीच यंत्रणा कार्यान्वित नव्हती. त्यामुळे नवा ठेकेदार नेमताना घनकचरा व्यवस्थापनेच्या नियमाप्रमाणे हे काम करण्याची जबाबदारी पालिकेवर आली आहे. शहरात दररोज १०५ टन कचरा निर्माण होत आहे. पालिकेच्या ५७ प्रभागांपैकी ५६ प्रभागांत कचरा उचलण्यासाठी ठेकेदारी पद्धतीने ७ कामगार नेमण्याची तसेच प्रत्येक प्रभागात एक गाडी कचरा संकलित करण्यासाठी देण्यात येणार आहे. अंबरनाथ पालिकेतील कर्मचारी कामचुकारपणा करत असल्याने ठेकेदारी पद्धतीने हे कामगार घेण्याची वेळ पालिकेवर आली आहे. अंबरनाथ पालिकेतील ५९४ कर्मचारी हे आता प्रभागनिहाय रस्ते स्वच्छ करणे आणि गटार स्वच्छ करण्याचे काम करणार आहेत. तर, ठेकेदारी पद्धतीने नेमलेले कामगार हे प्रभागातील कचरा संकलित करून ते घंटागाडीत टाकणार आहेत. नव्या निविदेत ज्या घंडागाड्या प्रस्तावित केल्या आहेत, त्या सर्व गाड्या नव्या असणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक घंटागाडीवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे. प्रत्येक प्रभागात गाडीची वेळ आणि थांबा निश्चित करणार असून नागरिकांच्या तक्रार नोंदणीकरिता टोल फ्री क्रमांक आणि कॉलसेंटर उभारण्यात येईल. कचरा संकलित झाल्यावर सुका कचरा डम्पिंग ग्राउंडवर टाकण्याबरोबरच ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी १८ कोटींच्या वर खर्च अपेक्षित असून तो खर्च १४ वा वित्त आयोग आणि स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत प्राप्त निधीतून करण्यात येणार आहे.