शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर ‘नैना’त सामान्यांसाठी १७१ घरे; २१ सप्टेंबर नोंदणी करा : सिडकोचे आवाहन

By कमलाकर कांबळे | Updated: September 18, 2023 20:04 IST

नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार ४००० चौ.मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत ‘नैना’ क्षेत्रात सिडकोने गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर १७१ घरे विक्रीसाठी उपलब्ध केली आहेत. यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी १७, तर अल्प उत्पन्न गटांसाठी १६४ सदनिकांचा समावेश आहे. या घरांसाठी २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालवधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. तर ८ नोव्हेंबर रोजी संगणकीय सोडत काढली जाणार आहे.

नैना प्रकल्पाच्या मंजूर डीसीपीआरनुसार ४००० चौ.मी. किंवा अधिक क्षेत्रफळ असलेल्या भूखंडांमध्ये सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटातील घरे विकसित करण्याची तरतूद आहे. त्याअनुषंगाने भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी २०% जागा ही आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक व अल्प उत्पन्न गटांच्या सदनिकांसाठी खासगी विकसकांना उपलब्ध केली आहे. या तरतुदीनुसार भोगवटा प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतर सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत सात विकसकांनी उपलब्ध सदनिकांची माहिती सिडकोस सादर केली आहे. योजनेअंतर्गत अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविले आहेत. यासाठी ऑनलाइन नोंदणी २१ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहणार आहे. ऑनलाइन शुल्क भरणा २९ सप्टेंबर ते १९ ऑक्टोबर या कालावधीत सुरू राहील. सोडतीकरिता स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २ नोव्हेंबर रोजी, तर अंतिम ४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध करणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे.

या प्रक्रियेत सिडकोची जबाबदारीसर्वसमावेशक योजनेअंतर्गत प्राप्त होणाऱ्या सदनिकांसाठी सोडत पद्धतीने पात्र उमेदवारांची निवड करून ती यादी संबंधित विकसकास पाठविणे एवढीच जबाबदारी सिडकोची आहे. त्यानंतर सदनिकेची संपूर्ण रक्कम भरून घेणे, गृहकर्जासाठी यशस्वी अर्जदारांना ना-हरकत प्रमाणपत्र देणे, अर्जदारासोबत सदनिकेचा करारनामा करणे, दुय्यम निबंधक कार्यालयाकडे करारनाम्याची नोंदणी करणे, सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करणे, अर्जदारांच्या काही शंका असल्यास त्याचे निरसन करणे आदींची सर्व जबाबादारी संबंधित विकसक पूर्ण करणार असल्याचे सिडकोने कळविले आहे.

टॅग्स :cidcoसिडको