शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या १६२ शिक्षकांच्या बदल्या

By admin | Updated: July 5, 2016 02:51 IST

महापालिकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ सोमवारी शिक्षकांना बदलीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे एकाच शाळेत कार्यरत असलेल्या १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

नवी मुंबई : महापालिकेच्या अधिकाऱ्यांपाठोपाठ सोमवारी शिक्षकांना बदलीच्या प्रक्रियेला सामोरे जावे लागले. अनेक वर्षे एकाच शाळेत कार्यरत असलेल्या १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये मुख्याध्यापकांसह पदवीधर शिक्षक व सहशिक्षकांचा समावेश आहे.महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जात सुधार घडवण्याच्या दृष्टीने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार शिक्षण विभागामार्फत १६२ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीला महापालिकेच्या ६८ प्राथमिक शाळांकरिता विविध संवर्गातील ७१५ शिक्षक पदांना मंजुरी आहे. प्रत्यक्षात मात्र ५४० कार्यरत आहेत. त्यापैकी बरेच शिक्षक अनेक वर्षांपासून एकाच शाळेत कार्यरत होते. त्यांची इतर शाळांमध्ये बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या शिक्षकांमध्ये १३ मुख्याध्यापक, ५ पदवीधर शिक्षक तर १४४ सहशिक्षकांचा समावेश आहे. किमान ७ वर्षे ४ महिने १५ दिवस ते कमाल १२ वर्षे एकाच शाळेत ते कार्यरत होते. अपंग संवर्गातील शिक्षक तसेच निवासाची गैरसोय होईल अशांना मात्र बदली प्रक्रियेतून वगळण्यात आलेले आहे, तर खैरणेतील एकमेव उर्दू माध्यमाच्या शाळेतील शिक्षकांनाही त्याच ठिकाणी ठेवण्यात आले आहे. शिवाय ज्या इमारतीमध्ये दोन शाळा असतील, त्याठिकाणच्या शिक्षकांची बदली करताना, त्याच इमारतीमधील शाळेत होणार नाही याचीही खबरदारी घेण्यात आलेली आहे. अनेक वर्षांनंतर झालेल्या शिक्षकांच्या बदल्यांमुळे शालेय व्यवस्थापनाला गती मिळून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक दर्जातही वाढ होईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)