शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

७०० कोटींच्या कंत्राटानंतर सल्लागाराला हवेत १५० कोटी

By कमलाकर कांबळे | Updated: August 2, 2023 14:38 IST

...त्यामुळे या प्रस्तावावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

नवी मुंबई : सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या जाहिरातीसाठी १५० कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित केला आहे. विशेष म्हणजे ६९९ कोटी घेऊन या घरांचे मार्केटिंग, ब्रॅण्डिंग आणि विक्रीसाठी सिडकोने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीनेच हा प्रस्ताव मांडला आहे. त्यामुळे या प्रस्तावावर सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. 

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत सिडकोच्या माध्यमातून ६७ हजार घरांची निर्मिती केली जाणार आहे. या घरांचे मार्केटिंग आणि विक्रीसाठी हेलिओस मीडिया बाजार आणि थ्रोट्रिन डिझाइन  प्रा. लि. या संयुक्त भागीदारीतील सल्लागार कंपनीला ६९९ कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे. 

संचालनासाठी कंपनीला दिले १२८ कोटीया  सल्लागार कंपनीची नियुक्ती होऊन एक वर्षे होत आले. या दरम्यान ३० डिसेंबर २०२२ रोजी ६७ कोटी व १३ फेब्रुवारी २०२३ रोजी ६१ कोटी मिळून १२८ कोटी रुपये या कंपनीला मोबिलायझेशन अर्थात संचालन खर्च म्हणून दिला आहे. यातून कंपनीने घरांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी कोणते दिवे लावले, हेसुद्धा गुलदस्त्यातच आहे.

वर्षभरात एकाही घराची विक्री नाहीसल्लागार कंपनीच्या नियुक्तीला एक वर्षे झाले. या काळात सिडकोची कोणतीही नवीन गृहयोजना जाहीर झाली नाही किंवा या सल्लागार कंपनीद्वारे सिडकोचे एखादे घरसुद्धा विक्री झालेले नाही. अशातच आता याच कंपनीने घरांच्या जाहिरातीसाठी १५० कोटी रुपये खर्चाचा वेगळा प्रस्ताव व्यवस्थापनासमोर ठेवला आहे. या प्रस्तावाबाबत सिडकोचा संबंधित विभागसुद्धा अनुकूल असल्याचे समजते. त्यामुळे सिडकोच्या भूमिकेविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे.सल्लागार कंपनीचा जाहिरातीचा आराखडा या सल्लागार कंपनीने जाहिरातीवर अपेक्षित १५० कोटी खर्चाचा मीडिया प्लॅन व्यवस्थापनासमोर सादर केला आहे.  त्यात वृत्तपत्रे, रेडिओ आणि आऊट ऑफ होम, आदी नॉनडिजिटल जाहिरातींवर ४० कोटी, सोशल मीडिया, सर्च इंजिन ऑफ्टिमाझेशन, आदी डिजिटल जाहिरातबाजीवर ४८ कोटी ५० लाख, सामुदायिक कार्यक्रम, पीआर ॲक्टिव्हिटीवर ४ कोटी, एव्ही सेटअप, स्पेस सेटअप, डिजिटल व आयटी सेटअप उभारणे आणि इव्हेंट मॅनेजमेंटसाठी  दोन मेगा एक्सपीरिअन्स सेंटर उभारणीकरिता १० कोटी, मार्केटिंग कोलॅटरल्सवर ४ कोटी, फोटोशूट, ड्रोनशूट, रँडर्स, वॉकथ्रूसाठी  ४ कोटी असा एकूणच १५० कोटी रुपये  खर्च प्रस्तावित केला आहे.  हा जाहिरात आराखडा  ४२ महिने अधिक २४ महिन्यांसाठी असेल, असे प्रस्तावात म्हटले आहे.

टॅग्स :cidcoसिडकोNavi Mumbaiनवी मुंबई