शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

15566 कोटी खर्च; 2500 मृत्यू; तरी...; मुंबई-गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत राज ठाकरेंचा संताप

By वैभव गायकर | Updated: August 16, 2023 15:46 IST

भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.

पनवेल : 2007 साली सुरु झालेला मुंबई गोवा महामार्गाच्या कामावर आजपर्यंत 15 हजार 566 कोटी रुपये खर्च झाले आहेत.विशेष म्हणजे रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आजपर्यंत 2500 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.मात्र तरी देखील या रस्त्याचे काम अर्धवटच असुन जनतेने निवडणूक दिलेले लोकप्रतिनिधी करतात तरी काय ? असा संतप्त सवाल राज ठाकरे यांनी दि.16 रोजी पनवेल येथे मनसेच्या निर्धार मेळाव्यात उपस्थित केला.

      भाषणाची सुरुवात करतानाच ठाकरे यांनी मी भाषण करायला आलो नाही मी तुम्हाला झेंडा दाखवायला आलो असल्याचे सांगत.मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबाबत मोठ्या आंदोलनाचा ईशारा दिला.चांद्रयान चंद्रावर जाऊन उपयोग काय ?तिथे जाऊन खड्डेच बघायचे होते तर ते चंद्रयान महाराष्ट्रात सोडायचं होत महाराष्ट्रातही खड्डे दिसले असल्याची टीका  राज ठाकरे यांनी केली.2007 सालापासून कॉग्रेस नंतर कोणाकोणाचे सरकार आले मात्र या खड्ड्यातून जात असताना तेच तेच लोकप्रतिनिधी का निवडता ? खोटे आश्वासन दिलेल्या नेत्यांवर विश्वास का ठेवता ? अमित ठाकरे एका मार्गावरून जात असताना टोल नाका मनसैनिकांनी फोडला तर भाजपने टीका केली की ; रस्ते बांधायला शिका आणि उभारायला शिका मग भाजपने दुसऱ्यांचे आमदार न फोडता स्वतःचा पक्ष बांधायला शिका अशी खोचक टीका यावेळी भाजपवर ठाकरे यांनी केली.2024 पर्यंत हा मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होईल असे मुख्यमंत्री सांगतात .मग आत्ताचे काय ? माणसे मेली त्याचे काय ? गणेशोत्सवात जाताना पुन्हा याच दुरावस्था झालेल्या मार्गातून कोंकणवासी जातील का ? अशी टीका ठाकरेंनी सरकारवर केली.रस्ते व्यवस्थित केले तर पैसे खायला कसा मिळणार ? तो सहा महिन्यात खराब व्हायला पाहिजे.तेव्हाच टेंडर,टक्केवारी कंत्राट मिळेल हा धंदा सुरूच असून हे कुठेतरी थांबायला हवे.मुंबई गोवा महामार्गाबाबत गडकरींना विचारला तर ते सांगतात कंत्राटदार पळून गेला.लवकरात लवकर मुंबई गोवा मागमार्गाचे काम पूर्ण झाले पाहिजे.

       कोंकणातील जमिनी कोणाच्या घश्यात जात आहेत.नाणार गेल्यावर बारसू कसे काय आले ? कोंकणवासियींना थोड्याशा पैशासाठी आपल्या जमिनी विकु नयेत असेही अवाहन यावेळी कोंकणवासीयांनाकेले .

पनवेल ते सावंत वाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या रस्त्याबाबत मनसैनिकानं पनवेल ते सावंतवाडी पर्यंत रस्त्यावर उतरावे लागेल.आपल्याला लोकांना त्रास न देता आंदोलन करायचे आहे.हे आंदोलन सरकारच्या सदैव्य लक्षात राहणारे असावे असा ईशारा देत.मुंबई गोवा महामार्गाच्या आंदोलनाबाबत मनसैनिकांनी तयार राहण्याचा सल्ला यावेळी पनवेल येथील निर्धार मेळाव्यात दिला. 

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेpanvelपनवेलMaharashtra Navnirman Senaमहाराष्ट्र नवनिर्माण सेना