शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताशी लढण्यासाठी ३ रुग्णालयांत १५ बेड आरक्षित; २४ नागरी आरोग्य केंद्रांत प्रथमोपचाराची सोय 

By नामदेव मोरे | Updated: May 1, 2024 18:59 IST

तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे.

नवी मुंबई : तीव्र उकाड्यामुळे उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने उपाययोजना सुरू केली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या तीन रुग्णालयांत १५ बेड आरक्षित केले असून, तेथे वातानुकूलित यंत्रणा बसविली आहे. याशिवाय सर्व २४ नागरी आरोग्य केंद्रांमध्ये प्राथमिक उपचाराची सोय केली आहे. नवी मुंबईमध्ये एप्रिलमध्ये ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी तापमान ३५ अंशांवर आले असले, तरी वातावरणातील उकाडा कायम आहे. पुढील एक महिना तापमान वाढण्याची शक्यता गृहीत धरून महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आरोग्य विभागाला दक्ष राहण्याच्या सूचना केल्या आहेत. 

उष्माघातामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला, तर उपचारासाठी प्रत्येक विभागात सुविधा करण्याचे सुचित केले आहे. आरोग्य विभागाने ऐरोली, वाशी व नेरूळ या तीन रुग्णालयांमध्ये प्रत्येकी पाच बेड आरक्षित केले आहेत. उष्माघाताच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी तयार केलेल्या वॉर्डमध्ये वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आली आहे. उपचारासाठी आवश्यक सर्व उपकरणे व तज्ज्ञ मनुष्यबळाचीही सोय केली आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची दिघा ते दिवाळेदरम्यान २४ नागरी आरोग्य केंद्रे आहेत. प्रत्येक आरोग्य केंद्रामध्येही उष्माघाताच्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यासाठी आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली आहेत. उष्माघाताची शक्यता गृहीत धरून आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या आहेत. ऐरोली, वाशी व नेरूळ रुग्णालयात स्वतंत्र कक्ष तयार केला आहे. नागरी आरोग्य केंद्रामध्येही प्राथमिक उपचारांची सोय केली आहे. - डॉ. प्रशांत जवादे, मुख्य वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिका नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

  • पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली, तरी अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्यावे.
  • घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री अथवा टोपीचा वापर करावा.
  • दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर जाणे टाळावे. अशक्तपणा, डोकुदुखी, सतत घाम येत असल्यास तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
  • उन्हात काम करणाऱ्यांनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान, चेहरा झाकावा.
  • गडद घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे.
  • तापमान जास्त असताना शारीरिक श्रमाची कामे टाळावी, जास्तीत जास्त कामे सकाळी व सायंकाळी करावी.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईhospitalहॉस्पिटल