शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: १४८ शिल्पाकृतींनी घातली नवी मुंबईच्या सौंदर्यात भर

By नामदेव मोरे | Updated: February 2, 2023 11:36 IST

Navi Mumbai: स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : स्वच्छता अभियानानिमित्त नवी मुंबई महानगरपालिका नावीन्यपूर्ण कल्पना राबवत आहे. टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत. १,७९० यंत्रभागांपासून नेरुळमध्ये उभारलेली फ्लेमिंगोची प्रतिकृती असो की सानपाडा येथील घोड्याची प्रतिकृती, ही शिल्पे सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. अशा प्रकारची १४९ शिल्पे शहरांतील चौकांत उभारली असून ती शहर सौंदर्यात भर घालत आहेत. महानगरपालिकने रिड्युस, रियूज व आणि रिसायकल या ‘थ्री आर’ वर लक्ष केंद्रित केले आहे. जुन्या टाकाऊ वस्तूंचा योग्य वापर करण्याचे आवाहन नागरिकांना केले जात आहे. जुने कपडे, भांडी, चप्पल, बूट यांचाही योग्य वापर केला जात आहे. जुन्या वस्तू व यंत्र सामग्रीमधून टिकाऊ शिल्प तयार केली आहेत. ही शिल्प तयार करताना शहराची संस्कृती, प्रकल्पग्रस्तांचा सांस्कृतिक वारसा, आधुनिक शहराची संकल्पना डोळ्यासमोर ठेवूनही उभारली आहेत.

फ्लेमिंगोची प्रतिकृती वेधतेय लक्ष नवी मुंबईचे आकर्षण स्थळ असलेल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ‘टाकाऊपासून टिकाऊ’ या संकल्पनेतून २८.५ फूट इतक्या उंचीची भव्यता अशी फ्लेमिंगो शिल्पाकृती उभारली आहे. २६ वेगवेगळ्या यंत्रातील १,७९० टाकाऊ यंत्रभागांपासून ती साकारण्यात आली आहे. त्याचीही विक्रमी नोंद ‘बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्स’मध्ये झाली आहे.

चरख्यासह चष्माही बनविलामहानगरपालिकेने यंत्रांच्या विविध वस्तूंपासून महात्मा गांधीजींचा चष्मा व चरखाही तयार केला आहे. महानगरपालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारापाशी ही प्रतिकृती ठेवली आहे. शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्येही अशा प्रकारची शिल्पे बसविली आहेत.

मेडिटेशन करणाऱ्याचे शिल्प n सानपाडा माेराज सर्कलजवळील घोड्याचे शिल्प, वाशी आसाम भवनजवळील मेडिटेशन करत असलेल्या नागरिकाचे शिल्पही सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. n शहरात अशा प्रकारची तब्बल १४८ शिल्प उभारली आहेत. महानगरपालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहर सुशोभीकरणासाठी अशाप्रकारे विविध संकल्पना राबविल्या जात आहेत.

अपघातग्रस्त कारची प्रतिकृतीपामबीच रस्त्यावर वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांनी व महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे. अपघाताचे भीषण वास्तव नागरिकांना समजावे यासाठी नेरुळमधील आगरी कोळी चौकामध्ये अपघातग्रस्त कारची प्रतिकृती ठेवली आहे.  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई