शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांना १४,४०० बोनस

By admin | Updated: October 20, 2015 23:50 IST

महापालिकेमधील कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कामगारांना स्थायी समितीने १४,४०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ६,३०० रुपये

नवी मुंबई : महापालिकेमधील कायमस्वरूपी सेवेत असणाऱ्या कामगारांना स्थायी समितीने १४,४०० रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ६,३०० रुपये दिले जाणार आहेत. सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मांडला जाणार असून, अजून किती वाढ होणार याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामगारांना दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान वेळेत देण्याची मागणी कामगार संघटनांनी केली होती. यावर्षी महागाई असल्यामुळे किमान २० हजार रुपये बोनस देण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. स्थायी समिती बैठकीमध्ये प्रशासनाने सानुग्रह अनुदानाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविला होता. गतवर्षी कायम कामगारांना १४ हजार रुपये सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. ठोक मानधन व रोजंदारीवरील कामगारांना ५,९०० रुपये देण्यात आले होते. स्थायी समिती सदस्यांनी बोनसमध्ये वाढ करण्याची मागणी केली. अखेर कायम कामगारांना १४,४०० व कंत्राटी कामगारांना ६,३०० रुपये रक्कम निश्चित केली. बोनसचा विषय अंतिम मंजुरीसाठी सर्वसाधारण सभेमध्ये मांडण्यात येणार आहे. यावेळी बोनसच्या रकमेमध्ये नगरसेवक किती वाढ सुचविणार याकडे सर्व कामगारांचे लक्ष लागले आहे. एप्रिल २०१४ ते मार्च २०१५ मध्ये या कालावधीमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांनाही बोनसची रक्कम मिळणार आहे. प्रतिनियुक्तीवर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही ही रक्कम दिली जाणार आहे.