शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील १४२ झाडांची कत्तल

By admin | Updated: January 10, 2017 06:59 IST

कळंबोली वसाहतीलगत मुंब्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे.

अरुणकुमार मेहत्रे / कळंबोलीकळंबोली वसाहतीलगत मुंब्रा महामार्गावर उड्डाणपूल बांधण्याचे काम रस्ते विकास महामंडळाने हाती घेतले आहे. जवळपास एक कि.मी. लांबीच्या या प्रकल्पाच्या आड एकूण १४२ झाडे येत आहेत. त्यांच्या जागी एकास तीन झाडे लावण्याच्या अटीवर येथील वृक्ष तोडण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार नव्याने ४२६ झाडे कंपनी लावणार आहे.कळंबोली स्टील मार्केटलगत ६१.३७ कोटी रुपये खर्च करून, हा उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू झाले आहे. टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा कंपनीला हे काम देण्यात आले असून, त्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. या मुदतीत काम पूर्ण करून, पूल वाहतुकीकरिता खुला करून देणे अपेक्षित आहे.कळंबोली गावातील काळभैैरव मंदिरापासून हा उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. पुलाची लांबी ११३० मीटर आहे. दोन्ही बाजूने मार्गिका असल्याने महामार्गाची रुंदीही वाढणार आहे. सद्या या ठिकाणी मध्यापासून २२ मीटर स्पॅनचे काम सुरू आहे. त्यामध्ये निलगिरी, सुबाभूळ, अन्य प्रजातीचे वृक्ष आहेत. हे वृक्ष तोडण्यासाठी टी अ‍ॅण्ड टी इन्फ्रा कंपनीने परवानगी घेतली आहे. या झाडांच्या बदल्यात दुसरीकडे झाडे लावण्याची अट रस्ते विकास महामंडळाने घातली आहे. सोमवारपासून स्टील मार्केटच्या बाजूकडील झाडे तोडण्यास सुरुवात झाली. ही झाडे पुनर्लागवड करण्यासारखी नसल्याने हा पर्याय अवलंबण्यात आला नसल्याचे ठेकेदार कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.