शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये खोदल्या १३ विंधण विहिरी

By admin | Updated: June 23, 2017 06:06 IST

पनवेल तालुक्यातील गावांत विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण १३ विंधण विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल तालुक्यातील गावांत विंधण विहिरी खोदण्यास सुरुवात झाली असून, आतापर्यंत एकूण १३ विंधण विहिरी खोदण्यात आलेल्या आहेत. यातील ९ विहिरींना पाणी लागले आहे, तर ४ विहिरींचे खोदकाम अयशस्वी ठरले आहे. २ विंधण विहिरी रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला आहे.पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून पनवेल तालुक्यातील संभाव्य टंचाईग्रस्त म्हणून १५ गावे, तर ३४ वाड्यांचा समावेश करण्यात आला होता. यातील ४ गावे आणि १४ वाड्यांमध्ये विंधण विहिरी खोदण्यास परवानगी मिळाली होती. यापैकी १३ विंधण विहिरी खोदण्यात आल्या आहेत. नानोशी, पाटनोली, मोसारे, मानघर, ताडाचा टेप, हाल्टेप, तुराडे ठाकूरवाडी, तुराडे वाडी, गुळसुंदे वाडी, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, नानोशी-माळमोसारे, नानोशी-कातकरवाडी या १३ गावांमध्ये विंधण विहिरी खोदण्यात आल्या. यापैकी माणघर, पाटनोली, नानोशी, हाल्टेप येथील विंधण विहिरींना पाणी लागले नाही. तर मोसारे, बोंडारपाडा, भेरले कातकरवाडी, नानोशी-कातकरवाडी, नानोशी-माळमोसारे, गुळसुंदे आदिवासीवाडी, तुराडे आदिवासीवाडी, तुराडे ठाकूरवाडी, ताडाचा टेप येथील विंधण विहिरींना पाणी लागले आहे. पोयंजे कातकरवाडी, पाली कातकरवाडी, कोंडले येथील विंधण विहिरींचे कामकाज अपूर्ण आहे. तर सांगुर्ली येथील फणसवाडी व माल्डुंगे येथील चिंचवाडी या गावांमध्ये बोअरवेलची गाडी जाण्यास रस्ता नसल्यामुळे विंधण विहिरी खोदण्यास आलेल्या नाहीत. त्यामुळे या दोन्ही ठिकाणच्या विंधण विहिरी रद्द करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेला असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर. डी. चव्हाण यांनी दिली.