शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीमध्ये १,२५१ बाटल्या रक्तसंकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 01:23 IST

राज्यातील रक्ततुटवडा भरून काढण्यासाठी उपक्रम

नवी मुंबई : राज्यातील रक्ताचा तुटडा भरून काढण्यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. पाच मार्केटमधील व्यापारी, माथाडी कामगार, सुरक्षारक्षकांनीही या शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग दर्शविला. दिवसभरात तब्बल १,२५१ बाटल्या रक्त संकलित झाले असून, रक्तपेढ्यांची क्षमता पूर्ण झाल्यामुळे सायंकाळी शिबिर थांबवावे लागले.मार्चपासून सतत ९ महिने नियमित रक्ताची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत असून, राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होऊ लागला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही रक्तदानाचे आवाहन केले आहे. राज्यातील रक्ताची गरज रक्षात घेऊन मुंबई बाजार समितीने शनिवारी विशेष रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. प्रत्येक नैसर्गिक संकट व राष्ट्रीय आपत्तीमध्ये बाजार समितीमधील माथाडी व व्यापारी मदतीचा हात पुढे करत असतात. रक्तदानाचा तुटवडा भरून काढण्यासाठी आवाहन केल्यानंतर पाचही मार्केटमध्ये सकाळीपासून रांगा लागल्या होत्या.बाजार समितीचे संचालक आमदार शशिकांत शिंदे, मुंबई बाजार समितीचे सभापती अशोक डक, उपसभापती धनंजय वाडकर, संचालक संजय पानसरे, शंकर पिंगळे, विजय भुत्ता, नीलेश वीरा, अशोक वाळुंज, सचिव अनिल चव्हाण, अतिरक्त सचीव संदीप देशमुख यांनी रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली. ३५२ रक्तदात्यांना हिमोग्लोबीन कमी असल्यामुळे व इतर कारणांमुळे इच्छा असूनही रक्त देता आले नाही. नवी मुंबई महानगरपालिका व खासगी रक्तपेढ्यांची रक्त साठविण्याची क्षमता पूर्ण झाल्यामुळे सायंकाळी ५ वाजता शिबिर थांबविण्यात आले. रक्तदान करू इच्छिणाऱ्यांची यादी तयार करून आवश्यकतेप्रमाणे रक्त देण्यात येणार आहे.मुंबई बाजार समितीमधील माथाडी कामगार, व्यापारी व सर्वच घटक नैसर्गिक संकट व राष्ट्रीय आपत्तीमध्ये मदतीसाठी पुढे येत असतात. राज्यात रक्ताचा तुटवडा असल्यामुळे रक्तदानाचे आवाहन करताच, सर्वांनी उत्स्फूर्तपणे शिबिरात सहभागी होऊन विक्रमी १,२५१ बाटल्या रक्ताचे संकलन केले आहे.- शशिकांत शिंदे, संचालक, मुंबई बाजार समिती