शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

१२५0 कर्मचाऱ्यांचा लागणार फौजफाटा

By admin | Updated: May 1, 2016 02:41 IST

प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला

- प्रशांत शेडगे,  पनवेल

प्रस्तावित पनवेल महापालिकेचा कारभार हाकण्यासाठी १२५0 कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्याची शिफारस अभ्यास समितीने आपल्या अहवालात केली आहे. महापालिकेला प्राप्त होणाऱ्या वर्गवारीच्या अनुषंगाने हे मनुष्यबळ प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपरिषदेकडे असलेले विद्यमान मनुष्यबळ विचारात घेवूनआवश्यक असणारा नवीन कर्मचारी वर्ग उपलब्ध केला जाणार आहे.पनवेल महानगरपालिकेचे वारे जोरात वाहू लागले आहे. याबाबत अहवाल सुध्दा तयार असून अंतिम बैठकीनंतर ते शासनाला सादर करण्यात येणार आहे. लोकसंख्येनिहाय महानगरपालिकेचा दर्जा ठरवला जातो. २0११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या गृहीत धरण्यात आलेली आहे. वास्तविक पाहता हा आकडा अधिक असला तरी त्यावेळी किती लोकवस्ती होती हा आकडा विचार घेण्यात आला आहे. त्यानुसार प्रस्तावित पनवेल महानगरपालिका ड वर्गात मोडणार आहे. शासनाकडून प्राप्त झालेल्या वर्गवारी नुसार संबधित महापालिकेत किती मनुष्यबळ असावे याचे निकष ठरले आहेत. त्यानुसार कर्मचारी वर्ग उपलब्ध करावा लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक कर्मचाऱ्यांची भरती करावी लागणार आहे. सिडको नोडमध्ये रस्ते, उद्याने व इतर पायाभूत सुविधांचा बऱ्यापैकी विकास झाला आहे. परंतु पनवेल शहराचा मात्र म्हणावा तसा विकास झालेला नाही. त्यामुळे पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यानंतर काही मोठे प्रकल्प हाती घेण्याचे या अभ्यास समितीने सुचित केले आहे. तक्का, मार्केट यार्ड आणि हरीओम नगर या परिसरात तीन मोठे उद्याने विकासीत करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या व्यतिरिक्त अंतर्गत रस्ते, पार्किंग, सार्वजनिक शौचालये, पिण्याचे पाणी, घनकचरा व्यवस्थापन आदी प्रकल्पांची उभारणी करण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रि या करण्याची व्यवस्था आगोदरच आहे. प्रक्रिया झालेल्या पाण्याचा वापर करण्यासंदर्भात या अहवालात मार्गदर्शक सुचना करण्यात आल्या आहेत. परिवहन सेवेला मिळणार चालणापनवेल शहरात रिंगरूट बससेवा करण्याचा प्रस्ताव गेल्या अनेक वर्षापासून प्रलबिंत आहे. त्यासाठी ५७ कोटी रूपयांचा ढोबळ खर्च अपेक्षित धरण्यात आला होता. परंतु पनवेल नगरपालिकेला हा खर्च न झेपणारा असल्याने हा प्रस्तावत काहीसा रखडला होता. असे असले तरी महापालिका अस्तित्वात आल्यानंतर परिवहन सेवेला चालणा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.