शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या घरांसाठी १,२३४ पोलिसांनी केली नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 00:52 IST

अर्ज सादर करण्याची २९ ऑगस्ट अंतिम मुदत

नवी मुंबई : सिडकोने खास पोलिसांसाठी सुरू केलेल्या गृहयोजनेला पोलिसांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील दहा दिवसांत या गृहप्रकल्पासाठी १,२३४ पोलिसांनी सिडकोच्या वेबपोर्टलवर नोंदणी केली आहे. यापैकी ७६७ पोलिसांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत.मुंबई प्रादेशिक क्षेत्रात काम करणाऱ्या पोलिसांसाठी सिडकोने २७ जुलै रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते या विशेष गृहयोजनेचा शुभारंभ केला आहे. यात ४,४६६ घरांचा समावेश आहे. २८ जुलैपासून प्रत्यक्ष नोंदणी सुरू करण्यात आली असून, २९ आॅगस्टपर्यंत घरांच्या नोंदणीसाठी पोर्टल खुले राहणार आहे. त्यानंतर, १५ सप्टेंबर रोजी या योजनेची संगणकीय सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मागील दहा दिवसांत या पोर्टला तब्बल २,७११ पोलिसांनी भेट दिली आहे. त्यापैकी शनिवारी सांयकाळपर्यंत १२३४ पोलिसांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून ७६७ जणांनी प्रत्यक्ष अर्ज सादर केले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आणखी २0 दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत आणखी अर्ज प्राप्त होतील, असा विश्वास सिडकोच्या संबधित विभागाने व्यक्त केला आहे.याच गृहप्रकल्पात ४,४६६ घरे खास पोलिसांसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. यापैकी १,0५७ सदनिका आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी तर उर्वरित ३,४0९ सदनिका अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहे. पोलीस कर्मचाऱ्यांना विविध करणांमुळे गृहस्वप्नाची पुर्तता करता येत नाही. परंतु सिडकोने त्यांना ही संधी उपलब्ध केली आहे. तळोजा, खारघर, कळंबोली, घणसोली, द्रोणागिरी येथे महागृहप्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे.मागणी तसा पुरवठा या तत्त्वावर घरांची निर्मित्ती करण्याच्या निर्णयानुसार सिडकोने विविध घटकांसाठी २ लाख १0 हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे.त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ९0 हजार घरांचे कामही सुरू करण्यात आले आहे.तत्पूर्वी २0१८ मध्ये सिडकोच्या माध्यमातून काढण्यात आलेल्या पंधरा हजार घरांच्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना पुढील दीड दोन महिन्यांत घरांचे प्रत्यक्ष वाटप करण्याची तयारी सिडकोने सुरू केली आहे.

टॅग्स :cidcoसिडको