शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतींसाठी दोन दिवसांत १२३४ अर्ज

By admin | Updated: June 2, 2017 05:59 IST

बारावीच्या आॅनलाइन निकालानंतर बुधवारपासून गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठीची प्रक्रि या मंडळाने सुरू केली. पहिल्याच

प्राची सोनवणे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बारावीच्या आॅनलाइन निकालानंतर बुधवारपासून गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठीची प्रक्रि या मंडळाने सुरू केली. पहिल्याच दिवसापासून विद्यार्थ्यांनी सकाळपासून वाशी येथील विभागीय मंडळ कार्यालयात रांगा लावल्या होत्या. ‘आयआयटी’ प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना वेटेज असल्याने, आयआयटी प्रवेश प्रक्रि येच्या वेळापत्रकापूर्वी छायांकित प्रती, गुणपडताळणी प्रक्रि या पूर्ण करावी अशी अपेक्षा विद्यार्थी, पालकांनी केली असून या विद्यार्थ्यांना प्रथम प्राधान्य दिले जात आहे. मंगळवारपासून गुणपडताळणी, छायांकित प्रतीसाठी अर्ज स्वीकारण्याची प्रक्रि या सुरू झाली. विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश प्रक्रि येसाठी अडचणी येऊ नयेत यासाठी मंडळाने यंदा निकालानंतर लगेच प्रक्रि येला सुरु वात केली. बुधवारी ५३० विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले तर गुरुवारी ७०४ विद्यार्थ्यांनी अर्ज केल्याची माहिती बोर्डाचे सहसचिव डॉ. सुभाष बोरसे यांनी दिली. गुणपडताळणीकरिता विद्यार्थ्यांना ९ जूनपर्यंत अर्ज करता येणार असल्याचेही बोरसे यांनी स्पष्ट केले. गुणपडताळणीकरिता बुधवारी ३९ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत तर गुरुवारी ६४ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. आतापर्यंत १०३ विद्यार्थ्यांनी गुणपडताळणीकरिता अर्ज केल्याची माहिती बोर्डाने दिली. छायांकित प्रतीकरिता विद्यार्थ्यांना १९ जूनपर्यंत अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना आयआयटी प्रवेश प्रक्रि येत आशा आहेत आणि राज्य मंडळाच्या परीक्षेत कमी गुण पडले आहेत अशा विद्यार्थ्यांना ही प्रक्रि या त्वरित व्हावी, अशी अपेक्षा आहे. अशा अनेक विद्यार्थी, पालकांनी मंडळात धाव घेतली आहे. दरवर्षी अर्ज भरण्याच्या प्रक्रि येनंतर अनेकदा विद्यार्थी, पालकांना मंडळात फेऱ्या माराव्या लागतात. छायांकित प्रती आल्यानंतरही निकाल वेळेत जाहीर होत नाही. आयआयटीच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांना अधिक महत्त्व आहे. काही विद्यार्थ्यांना तिकडे चांगले गुण आहेत, परंतु मंडळाच्या गुणांमध्ये थोडी तफावत वाटते आहे अशा विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार की नाही अशी काळजी व्यक्त केली.छायांकित प्रतीकरिता प्रत्येक विषयासाठी ४०० रुपये मोजावे लागत आहे. गुणपडताळणीकरिता ५० रुपये मोजावे लागत आहेत. ११ जुलैपासून फेरपरीक्षा होणार असून विद्यार्थ्यांना १४ जूनपर्यंत नियमित शुल्कासह परीक्षेसाठी अर्ज करता येणार आहे तर विलंब शुल्कासह १९ जूनपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. छायांकित प्रती, गुणपडताळणीची प्रक्रि या वेळेत पूर्ण करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहे. याकरिता विद्यार्थ्यांना कोणती अडचण येणार नाही यादृष्टीने विभागाचे कामकाज सुरू आहे. जेईई परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची गुणपडताळणी, छायाप्रत मूल्यांकन तातडीने व प्राधान्याने केले जाणार आहे. - डॉ. सुभाष बोरसे, सहसचिव, मुंबई बोर्ड.