शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

बेस्टकडून ११८ बसची खरेदी रद्द

By admin | Updated: June 16, 2017 02:47 IST

बेस्ट बचावसाठी तयार केलेला आराखडा वादात सापडल्याने पालिकेकडून मिळणारी मदतही लांबणीवर पडली. यामुळे बेस्ट खरेदी करीत असलेल्या ३०३ बसगाड्यांपैकी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बेस्ट बचावसाठी तयार केलेला आराखडा वादात सापडल्याने पालिकेकडून मिळणारी मदतही लांबणीवर पडली. यामुळे बेस्ट खरेदी करीत असलेल्या ३०३ बसगाड्यांपैकी ११८ बसची खरेदी रद्द करण्याची नामुष्की बेस्ट प्रशासनावर ओढावली आहे. ५७ कोटी रुपये उभे करणे शक्य नसल्याने या बसगाड्यांची मागणी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे बस स्थानकावरील प्रवाशांची प्रतीक्षा वाढणार आहे. त्याचवेळी या संकटातून बाहेर पडण्यासाठी पालिका प्रशासनाला गळ घालण्याचे प्रयत्नही बेस्ट समितीने सुरू ठेवले आहेत. मुंबई महापालिकेने दिलेल्या ९० कोटी रुपयांच्या अनुदानातून बेस्टने ३०३ बसगाड्या टाटाकडून खरेदी करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. या बसगाड्यांसाठी बेस्ट उपक्रम टाटा कंपनीला १५३ कोटी रुपये देणार आहे. यापैकी पालिकेकडून ९० कोटी रुपयांचा पहिला हफ्ता बेस्टला मिळाला. तर ५७ कोटी रुपये बेस्टला स्वत: उभे करायचे होते. ३० मार्चपर्यंत बस खरेदी केल्यास आर्थिक मदतीची तयारी पालिकेने दाखवली होती. मात्र या बसगाड्यांची खरेदी लांबणीवर पडली, याच दरम्यान दिलेली मुदत संपल्यामुळे पालिका प्रशासनाने हात आखडते घेतले आहेत. त्यामुळे बस खरेदीचा बेस्टचा प्रयत्न फसला आहे. आर्थिक स्थिती नाजूक असल्याने ही खरेदी रद्द करण्याची वेळ बेस्ट प्रशासनावर आली आहे. याबाबतचा प्रस्ताव बेस्ट समितीच्या पटलावर लवकरच चर्चेसाठी येणार आहे. अशा आहेत मागण्याआर्थिक मदत मिळावी, कर्जाचे व्याज दर कमी असावे, बेस्टचा अर्थसंकल्प महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीन करावा, पालिका आकारत असलेल्या विविध करांतून सूट मिळावी.सर्वपक्षीय सदस्य सोमवारी आयुक्तांच्या भेटीलाबेस्ट उपक्रमाने मदतीसाठी महापालिकेला साकडे घातले होते. त्यानुसार आर्थिक मदत करण्याची तयारी पालिका आयुक्तांनी दाखवली होती. मात्र तत्पूर्वी त्यांनी बेस्ट उपक्रमाला बेस्ट बचावाचा कृती आराखडा तयार करण्याची अट घातली. मात्र हा आराखडा वादात सापडून रखडला आहे. कर्मचारी व त्यांच्या भत्त्यांमध्ये कपात करण्याच्या शिफारशींना विरोध दर्शवीत हा आराखडा बेस्ट समितीने नामंजूर केला आहे. त्यामुळे बेस्टची आर्थिक अडचण वाढली आहे. यामुळे मदत मिळवण्यासाठी बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल कोकीळ व सर्वपक्षीय सदस्य सोमवारी पालिका आयुक्तांची भेट घेणार आहेत. - बेस्टच्या ताफ्यात ४८०० बसगाड्या होत्या - सध्या बस ताफा ३७०० आहे - यापैकी ३५०० बसगाड्या रस्त्यावर धावतात - ३०३ नवीन बसगाड्या बेस्ट खरेदी करणार होती - ११८ बसगाड्यांची आॅर्डर रद्द करण्यात येणार आहे