शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

११ टक्के रुग्ण १८ वर्षांखालील, पण लसीकरण नाही, ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 23:42 IST

तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण केंद्रे बंद : सर्व वयोगटांसाठी लस उपलब्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : शहरातील ११ टक्के रुग्ण १८ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांना लसीकरणासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी असूून त्यांना वेळेत लस मिळणार की नाही याविषयी साशंकता आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे, परंतु तुटवड्यामुळे वारंवार लसीकरण बंद ठेवावे लागत असल्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.             राज्यातील कोरोनाच्या हॉटस्पॉटमध्ये नवी मुंबईचा समावेश आहे. 

आतापर्यंत ८५ हजार नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. नवीन रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे सर्वांना लस उपलब्ध करून देण्याची मागणी होऊ लागली आहे. सद्यस्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. सोमवारपर्यंत १ लाख ८३ हजार ६०४ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. शहराची लोकसंख्या १४ लाखपेक्षा जास्त असून लसीकरणाची गती हीच राहिली तर सर्वांना लस मिळण्यासाठी जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. यामुळे सर्वांना व गतीने लस उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. शहरात कोरोनाची सर्वाधिक लागण तरुणांना होत आहे. परंतु त्यांना अद्याप लस दिली जात नाही. एकूण रुग्णांपैकी १८ वर्षांपेक्षा कमी वय असलेले ११ टक्के रुग्ण आहेत. पण या वयोगटातील नागरिकांना लस मिळविण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. शहरातील तब्बल ५३ टक्के रुग्ण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. या वयोगटातील नागरिकांना १ मेपर्यंत प्रतिीक्षा करावी लागणार आहे.

शहरात ४५ वर्षांवरील ४७ टके रुग्ण असून त्यांच्यासाठी लसीकरण सुरू आहे. परंतु त्या सर्वांनाही वेळेत लस मिळत नाही. पुरेसे डोस उपलब्ध होत नसल्यामुळे वारंवार लसीकरण थांबवावे लागत आहे. शहरात नियमित व सर्व वयोगटातील नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे. 

४० वर्षांखालील तब्बल ४५,७६३ रुग्णशहरात सर्वाधिक रुग्ण ४० वर्षांखालील आहेत. आतापर्यंत या वयोगटातील तब्बल ४५,७६३ जणांना कोराेनाची लागण झाली आहे. या वयोगटातील नागरिक नोकरी, व्यवसायासाठी नेहमी बाहेर असतात. यामुळे त्यांना कोरोनाची लागण होत आहे. शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना १ मेपासून लस देण्याचे जाहीर केले आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये ४५ वर्षांवरील नागरिकांना लस पुरवितानाच दमछाक होत असून १८ वर्षांवरील नागरिकांसाठी पुरेसी लस मिळणार का, याविषयी उत्सुकता लागून राहिली आहे.

लहान मुलांची काळजी अधिक घ्यावी लागणारn१८ वर्षांपेक्षा कमी वयोगटातील मुलांना लस देण्यासाठी मंजुरी मिळण्यास वेळ आहे. यामुळे या वयोगटातील मुलांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. nमुलांना काम नसेल तर घराबाहेर जाण्यास मंजुरी देऊ नये. त्यांचा आहार व व्यायामावर लक्ष द्यावे. गर्दीच्या ठिकाणी मुले जाणार नाहीत याचीही काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

१८ वर्षांखालील ९,६५४ रुग्णनवी मुंबईमध्ये लहान मुलांमध्येही कोरोनाची लागण वाढत आहे. आतापर्यंत १८ वर्षांच्या आतमधील तब्बल ९६५४ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या वयोगटातील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त असले तरी या वयात गंभीर अजार झाल्यामुळे त्याचा परिणाम भविष्यातही त्यांना सहन करावा लागण्याची शक्यता आहे. यामुळे या लहान मुलांनाही लस लवकर उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या