शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई शहरात 10 शाळा अनधिकृत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 00:42 IST

संख्या होतेय कमी : या वर्षी होणार दंडात्मक कारवाई

योगेश पिंगळे

नवी मुंबई :  शैक्षणिक वर्ष २०२०- २१ या काळात नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मान्यता न घेता सुरू असलेल्या १० अनधिकृत शाळा सुरू आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी ऑनलाइन शिक्षण सुरू असून, २०२१- २२ या शैक्षणिक वर्षातील अनधिकृत शाळांची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. 

आरटीई अधिनियमानुसार कोणतीही नवीन शाळा मान्यतेशिवाय चालविता येत नाही; मात्र तरीही नवी मुंबई शहरातील काही शिक्षण संस्थांकडून प्राथमिक शाळा सुरू असून, विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जात आहेत. या शाळांना मान्यता नसल्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे. ते टाळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध होते, तसेच पालकांनी  या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन केले जाते. अनधिकृत शाळांना नोटीस पाठवून संबंधित शिक्षण संस्थांनी शाळेतील विद्यार्थ्यांना  पालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त शाळेत  दाखल करावे आदी निर्देश दिले जातात. दरवर्षी राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेमुळे गेल्या काही वर्षांपासून शहरातील अनधिकृत शाळांची संख्या कमी झाली आहे. २०२०- २१ या शैक्षणिक वर्षात शहरात १० शाळा अनधिकृत असल्याचे पालिकेने घोषित केले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अद्याप प्रत्यक्षात शाळा सुरू झाल्या नाहीत; परंतु ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. या वर्षात शहरात किती शाळा अनधिकृत आहेत, याबाबत माहिती घेण्याचे काम सुरू असून, येत्या काही दिवसांत याबाबत महापालिकेच्या माध्यमातून अनधिकृत शाळांची यादी घोषित केली जाणार आहे.

बोर्डाची परीक्षा देण्यास अडचणीअनधिकृत शाळांमध्ये शिकणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेचे फॉर्म भरता येत नाहीत. त्यामुळे अनधिकृत शाळांमध्ये प्रामुख्याने प्राथमिक वर्ग सुरू केले जातात. यामुळे आठवीतून नववीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये प्रवेश घ्यावा लागतो, तसेच या शाळांमधून आठवीपर्यंत शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये नववीत प्रवेश घेताना विविध समस्यांचा सामना करावा लागतो.

अनधिकृत शाळांवर होणार दंडात्मक कारवाईमहापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांना या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचे आवाहन पालकांना केले जाते, तसेच शाळेला याबाबत नोटीस पाठवून शाळा बंद करण्याचे निर्दश दिले जातात. शहरातील अनधिकृत शाळांवर या वर्षांपासून दंडात्मक कारवाईदेखील केली जाणार आहे.

नवीन शैक्षणिक वर्षातील अनधिकृत शाळांची यादी जमा करण्याचे काम सुरू आहे. या शाळांकडून दंड वसूल केल्यावर कोणत्या हेडखाली त्याचा भरणा करायचा याची उपसंचालकांकडून माहिती मागवली आहे. -  योगेश कडुस्कर (शिक्षण उपआयुक्त, न.मुं.म.पा)

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई