शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार शेतकऱ्यांना हवी नुकसानभरपाई

By admin | Updated: May 23, 2016 03:11 IST

खारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागखारबंदिस्तीची कामे योग्य न झाल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये खारे पाणी घुसून सुमारे तीन हजार एकर शेती नापीक झाल्याचा दावा श्रमिक मुक्ती दलाने केला आहे. हे दुष्टचक्र तोडून २६ वर्षांपासूनची सुमारे ३९० कोटी रुपयांची नुकसानीच्या भरपाईची मागणी करण्यासाठी १० हजार शेतकरी संघटित झाले आहेत. खारभूमी विभागाला एवढ्या मोठ्या रकमेची नुकसानभरपाई देताना चांगलाच घाम फुटणार असल्याचे बोलले जाते. आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सुगीचे दिवस येणार असल्याचे दिसून येते. सोमवारी जिल्हाधिकारी याप्रश्नी बैठक घेणार आहेत.२ एप्रिल २०१६ रोजी पेण येथील खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभागाचे कार्यकारी अभियंता यांची बैठक श्रमिक मुक्ती दलासोबत पार पडली होती. त्यानंतर खारभूमीला जाग आली. जमेची बाजू म्हणजे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी यांनी कुर्डूस ते मानकुळे या खारेपाटातील नापीक जमिनीची माहिती घेण्याची सूचना खारभूमी विकास उपविभागाचे सहायक कार्यकारी अभियंता एस.पी.पवार यांनी केली आहे. याबाबतचे पत्रच त्यांनी २९ एप्रिल २०१६ रोजी कृषी विभागाला पाठवले आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये प्रतिवर्षी एकरी २० क्विंटलहून अधिक भाताचे उत्पादन होत होते. तसेच त्यामाध्यमातून किमान ५२ लोकांना रोजगार मिळत होता. शेतीच्या बांधावर भाजीपाला पिकवला जात होता. १०० किलो मासे नैसर्गिकरीत्या मिळत होते. मात्र शेतीमध्ये खारेपाणी घुसून शेतीचे नुकसान झाले. त्यामुळे आर्थिक कणा मोडल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.संरक्षक बंधाऱ्यांची योग्य निगा व दुरुस्ती न केल्याने जमीन नापीक झाली. दरवर्षी ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. जमीन पुन्हा सुपीक करण्यासाठी किमान एक लाख रुपये खर्च येणार आहे. त्यामुळे खारभूमी विभागाने जमीन नापीक झाल्यापासून आजपर्यंतची नुकसानभरपाई आठ टक्के व्याजासहित देण्याची मागणी अभिमन्यू वाघ या शेतकऱ्याने खारभूमी विभागाकडे लेखी केली आहे. अर्ज दाखल करणार मेढेखार, देहनकोनी, काचळी पिटकरी, शहाबाज, कमळपाडा, धामणपाडा, सोनकोठा, हाशिवरे येथील सुमारे १० हजार शेतकरी ३००० एकर शेतीसाठी ५० हजार रु. एकरी नुकसानभरपाईसाठी अर्ज २६ मे रोजी दाखल करणार असल्याचे डॉ. भारत पाटणकर यांनी सांगितले.विशेष बैठक आजखारभूमी विभागाने कृषी विभागाला सर्वेक्षण करण्याबाबत कळविले आहे. सोमवारी जिल्हाधिकारी यांच्याकडे याबाबत विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीला संबंधित विभागासह श्रमिक मुक्ती दलालाही बोलवले असल्याचे खारभूमी विभागाचे उपअभियंता सुरेश शिरसाट म्हणाले.> योजनेचे नावक्षेत्र हेक्टरफणसापूर कुर्डूस खारभूमी योजना १५६कोपरी चिखली खारभूमी योजना ५२काचली पिटकरी खारभूमी योजना ३३४मेढेखार खारभूमी योजना १७६देहेनकोनी खारभूमी योजना १६९शहाबाज खारभूमी योजना४९८कमळपाडा धामणपाडा खारभूमी योजना ३५०धाकटापाडा शहापूर खारभूमी योजना ३४५मोठापाडा शहापूर (खासगी) खारभूमी योजना ४२३धेरंड खारभूमी योजना १४९सोनकोठा खारभूमी योजना२६५मानकुळे खारभूमी योजना ५००एकूण३४१७