शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील १० शाळा होणार बंद!

By admin | Updated: February 11, 2017 04:21 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील १२ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १०पेक्षा कमी असल्यामुळे त्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे

मयूर तांबडे,  पनवेलरायगड जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील १२ शाळांमधील विद्यार्थी पटसंख्या १०पेक्षा कमी असल्यामुळे त्या बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या शाळांमधील विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असल्याने पालकवर्ग चिंतेत आहे. विद्यार्थ्यांअभावी पनवेल तालुक्यातील मराठी शाळांवर संकट ओढावले आहे. गतवर्षीपर्यंत पनवेल तालुक्यात रायगड जिल्हा परिषदेच्या २६४ शाळा होत्या. त्यातील ५ शाळा विद्यार्थी पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत. यात चाफेवाडी, चिंचवाडी आणि खंगारपाडा, वाघ्राची वाडी, कोंड्याची वाडी या पाच शाळांचा समावेश होता. बंद झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांना आजूबाजूच्या शाळेत पाठविण्यात आले आहे. त्यामुळे २६४ वरून पनवेलमधील जिल्हा परिषदेच्या शाळांची संख्या २५९वर आली आहे. पटसंख्या शून्य झाल्यामुळे या शाळा बंद झाल्या आहेत. सद्यस्थितीत आणखी १२ शाळांतील विद्यार्थी संख्या १० पेक्षाही कमी आहे. काही शाळांमध्ये केवळ ३ ते ५ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तालुक्यातील एकूण २१ केंद्रामधील १२ शाळांमध्ये १०पेक्षा कमी विद्यार्थी संख्या आहे. त्यामुळे या शाळा बंद झाल्या, तर विद्यार्थी प्राथमिक शिक्षणापासून वंचित राहतील. त्यामुळे खेड्यापाड्यातील मुलांचे भवितव्य अंधारमय होण्याची शक्यता आहे.