शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
2
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
3
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
4
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
5
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
6
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
7
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
8
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
9
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
10
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
11
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
12
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला
13
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
14
आरोपीची मिरवणूक काढणाऱ्यांचीच ‘वरात’; पोलिसांनी दाखल केला गुन्हा!
15
वसईतील पर्यटनस्थळांवर पोलिसांचा मनाई आदेश; चिंचोटी, देवकुंडी धबधब्यात जाण्यास पर्यटकांना मज्जाव
16
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
17
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
18
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
19
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
20
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज

जिल्ह्यात १० बंदरे धक्क्याला

By admin | Updated: February 1, 2016 01:42 IST

जिल्ह्यातील २३ ठिकाणी लहान मासेमारी बंदर उभारण्याच्या प्रस्तावांपैकी वरसोली आणि करंजा येथील जागेचे प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे.

आविष्कार देसाई, अलिबागजिल्ह्यातील २३ ठिकाणी लहान मासेमारी बंदर उभारण्याच्या प्रस्तावांपैकी वरसोली आणि करंजा येथील जागेचे प्रस्ताव योग्य असल्याचा निर्वाळा मत्स्य व्यवसाय विभागाने दिला आहे. पैकी ११ प्रस्तावात सुचविण्यात आलेल्या जागेमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे. त्यामुळे ६४ लाख रुपयांच्या खर्चाची लहान बंदरे सध्यातरी ‘धक्क्याला’ लागली आहेत. उर्वरित १० प्रस्तावांबरोबरच काट मारण्यात आलेल्या ११ ठिकाणी लहान बंदरे विकसित करण्यासाठी मत्स्य विभागाने सर्वेक्षण सुरु केले आहे.लोकप्रतिनिधींनी विकासकामे सुचविताना कामांबाबत काय नियमावली आहे याची माहिती करुन घेण्याची गरज त्यानिमित्ताने आता समोर आली आहे. मासेमारी करणाऱ्यांना मच्छी सुकविण्यासाठी जागा उपलब्ध नसल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते. मासेमारी व्यवसाय टिकून राहावा, मच्छीमारांच्या उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होऊ नये यासाठी जिल्ह्यातील समुद्र आणि खाडी किनारी असलेल्या ठिकाणी लहान मासेमारी बंदरांची निर्मिती करण्याची गरज निर्माण झाली. जिल्हा नियोजन समितीमार्फत मच्छी सुकविण्यासाठी मच्छीमार बांधवांना लहान मासेमारी बंदर बांधून देण्याची तरतूद आहे. या वर्षी एक कोटी रुपये मंजूर केले आहेत. स्थानिक पातळीवरची गरज विचारात घेऊन विकासकामे कोठे झाली पाहिजेत यासाठी लोकप्रतिनिधी कामे सुचवितात. त्यानुसार त्यांनी २३ लहान बंदरांच्या निर्मितीचा प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीपुढे ठेवला. यासाठी एक कोटी १४ लाख ६६ हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सुचविण्यात आलेल्या २३ कामांपैकी फक्त अलिबाग तालुक्यातील वरसोली आणि उरण तालुक्यातील करंजा येथील जागा या खारफुटी वनस्पतींच्या क्षेत्राबाहेर आहेत. त्या जागा लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी योग्य असल्याने तेथे प्रत्येकी पाच लाख रुपये खर्चाचे लहान मासेमारी बंदर उभारण्यात येणार आहे. उर्वरित बहुतांश जागा या पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या आहेत. त्यामुळे त्या सर्व प्रस्तावांवर पाणी पडले आहे. लोकप्रतिनिधींनी जेथे काम करायचे आहे त्याबाबतच्या नियमावलीचा अभ्यास न करताच प्रस्ताव तयार केल्याचे दिसून येते. अभ्यासपूर्ण कामाची मागणी केल्यास पहिल्याच टप्प्यामध्ये प्रस्ताव मंजूर होऊन कामांना लवकर सुरुवात झाली असती आणि पर्यायाने जिल्ह्यातील विकासकामांनाही गती प्राप्त झाली असती. मात्र दुर्दैवाने तसे झालेले नाही. लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी नवीन जागेच्या सर्वेक्षणाचे काम सुरु असल्याचे जिल्हा मत्स्य व्यवसाय विभागाचे अविनाश नाखवा यांनी सांगितले.लहान मासेमारी बंदरे बांधण्याचे २३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. मात्र वरसोली, करंजा याच जागा लहान मासेमारी बंदर बांधण्यासाठी नियमांना धरुन आहेत. मत्स्य व्यवसाय विभागाला सर्वेक्षण करण्यास सांगितले आहे. नंतर निधी वितरीत केला जाईल.-सुनील जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी, रायगड