शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
3
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
4
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
5
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
6
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
7
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
8
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
9
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
10
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
11
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
12
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
13
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
14
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
15
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
16
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
17
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
18
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
19
आता लोकलच्या दारात लटकता येणार नाही; प्रयोग सुरु, कारण...
20
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

झुमच्या बैठकीत उद्योजकांना झुलविले

By admin | Updated: March 21, 2015 00:20 IST

जिल्हाधिकारी व्यस्त : ठोस निर्णय नाहीच; चहापाण्यावरच गुंडाळली बैठक

जिल्हाधिकारी व्यस्त : ठोस निर्णय नाहीच; चहापाण्यावरच गुंडाळली बैठकनाशिक - तब्बल सात महिन्यांनंतर मुहूर्त लागलेल्या जिल्हा उद्योगमित्रची (झुम) बैठक नेहमीप्रमाणे यावेळीदेखील चर्चेचा विषय ठरली. मात्र यावेळी आरोप-प्रत्यारोपांनी नव्हे, तर जिल्हाधिकार्‍यांच्या व्यस्त नियोजनामुळे कुठलाही ठोस निर्णय न घेताच चहापाण्यावर बैठक गुंडाळण्यात आली. तीन ते पाच वाजेपर्यंत उद्योजकांना झुलवित ठेवल्याने बैठकीच्या नियोजनाचा नेमका हेतू काय? असा सवाल उद्योजकांमध्ये उपस्थित केला गेला. जिल्‘ातील सातपूर, अंबड, सिन्नर, माळेगाव, जानोरी, दिंडोरी, वाडीवर्‍हे आदि औद्योगिक वसाहतींमधील गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या तब्बल ५९ विषयांवर बैठकीत चर्चा होणे अपेक्षित होते. मात्र उद्या (दि.२१) केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांच्या नाशिक जिल्हा दौर्‍याचे नियोजन असल्याने जिल्हाधिकारी यांना बैठकीला वेळ देणे शक्य नव्हते. त्यातच मुख्यमंत्री कार्यालयातून दर पाच मिनिटाला जिल्हाधिकार्‍यांचा मोबाइल खणाणत असल्याने त्यांना बैठकीतून बाहेर पडावे लागत असे. त्यामुळे बैठकीतील विषयांवर चर्चा कमी अन् आपापसातील गप्पागोष्टींनाच अधिक उधाण आले होते. दरम्यान, नियोजित वेळेपेक्षा एक तासाने सुरू झालेल्या या बैठकीत उद्योगांसाठी जागा उपलब्ध करून देणे, अंबड एमआयडीसीत फायर स्टेशन सुरू करणे, अंबड औद्योगिक क्षेत्रातील मोकळ्या भूखंडांना तार कंपाउंड उभारणे, सिन्नर एमआयडीसी येथे ट्रक टर्मिनस सुरू करणे, औद्योगिक पाणी दरवाढ रद्द करणे, विकास शुल्काबाबतचा निर्णय घेणे, सिन्नर एमआयडीसीतील पथदीप दुरुस्त करणे, माळेगाव, सिन्नर एमआयडीसीत संयुक्त ईटीपी सुरू करणे, सातपूर-अंबड औद्योगिक क्षेत्रात पावसाच्या सांडपाण्याची ड्रेनेजची व्यवस्था करणे आदि विषयांवर चर्चा करण्यात आली. मात्र एकाही विषयावर ठोस निर्णय घेतला गेला नाही. त्यामुळे सदर उद्योगमित्र बैठक ही उद्योजकांचा स्नेहमेळावा असल्याची चर्चा उद्योजकांमध्ये रंगली होती. बैठकीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी रामदास खेडकर, कार्यकारी अभियंता भंडोपिया, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक साहेबराव पाटील, उद्योजक रवि वर्मा, मनीष कोठारी आयमाचे विवेक पाटील, उन्मेश कुलकर्णी, निखिल पांचाळ, राजेंद्र अहिरे, सुधाकार देशमुख, जयप्रकाश जोशी, विनस वाणी, रमेश पवार, लघु उद्योग आघाडीचे प्रदीप पेशकार आदि उपस्थित होते. ---इन्फोजिल्हाधिकार्‍यांनी दिली डेडलाइनजिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी तीन वाजता झुमच्या बैठकीचे आयोजन केले होते. मात्र नियोजित वेळेपेक्षा एक तास उशिरा सुरू झालेल्या बैठकीच्या प्रारंभीच जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी पाच वाजेपर्यंतच मी बैठकीला वेळ देऊ शकेल, असे जाहीर केले. त्यामुळे तासाभरात ५९ विषयांवर कशी चर्चा करावी, असा प्रश्न उद्योजकांमध्ये उपस्थित केला गेला. ---उद्योजक-अधिकार्‍यांमध्ये सामनासातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीमधील अपघाती वळणावर झेब्रा क्रॉसिंगचे प˜े मारावेत असा विषय चर्चेला आणला असता मनपाचे पी. बी. चव्हाण यांनी संपूर्ण वसाहतीत झेब्रा क्रॉसिंगचे प˜े मारले असल्याचे सांगितले. यावर उद्योजकांनी आक्षेप घेत कुठल्या भागात झेब्रा क्रॉसिंगचे प˜े मारले याची यादी द्यावी, असा प्रश्न उपस्थित केला. मात्र चव्हाण यांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत उद्योजकांनीच पाहणी करावी, असे उत्तर दिले. त्यामुळे काहीकाळ उद्योजक अधिकार्‍यांमध्ये सामना रंगला होता. ---मनपाच्या अधिकार्‍यांची दांडीझुमच्या बैठकीत मांडण्यात येणारे बहुतेक विषय मनपाशी निगडीत होते. मात्र, मनपाच्या संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी बैठकीला दांडी मारल्याने कुठल्याही विषयावर समाधानकारक भूमिका मांडता आली नाही. दरम्यान, बैठकीला मनपा आयुक्तांना बोलविण्यात यावे, अशी मागणी उद्योजकांनी केली.फोटो क्र. २०पीएचएमआर११२जिल्हा उद्योगमित्रच्या बैठकीत बोलताना जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह.