शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्य देणार आमदारांना आव्हान जिल्हा नियोजन समितीचा वाद : कपात केलेला निधी परत मिळवण्याचा निर्धार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2016 23:32 IST

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने चालू वर्षीच्या नियोजनातून जिल्हा परिषदेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. हा निधी परत मिळावा, यासह अतिरिक्त वाढीव दहा टक्के निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य एकवटले आहेत. सोमवारी होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे अधिकृत सदस्य असणारे जिल्हा परिषदेचे ३२ सदस्य पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार यांना आव्हान देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सेना-भाजपाचे सदस्य आघाडीच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी कपात केलेल्या निधीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली.

अहमदनगर : जिल्हा नियोजन समितीने चालू वर्षीच्या नियोजनातून जिल्हा परिषदेच्या २२ कोटी रुपयांच्या निधीला कात्री लावली आहे. हा निधी परत मिळावा, यासह अतिरिक्त वाढीव दहा टक्के निधी मिळावा, यासाठी जिल्हा परिषद पदाधिकारी व सदस्य एकवटले आहेत. सोमवारी होणार्‍या नियोजन समितीच्या बैठकीत समितीचे अधिकृत सदस्य असणारे जिल्हा परिषदेचे ३२ सदस्य पालकमंत्री राम शिंदे आणि आमदार यांना आव्हान देणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी सेना-भाजपाचे सदस्य आघाडीच्या सदस्यांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार आहेत. जलयुक्त शिवार योजनेसाठी कपात केलेल्या निधीबद्दल तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. शनिवारी अध्यक्षा मंजुषा गुंड यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन समितीतून कपात केलेल्या निधी संदर्भात जिल्हा परिषदेत बैठक झाली. सुरुवातीला कपात केलेला निधी आणि केंद्र सरकारकडे मागण्यात आलेल्या निधी संदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी माहिती दिली. यावेळी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, कृषी सभापती शरद नवले, मीरा चकोर, नंदा वारे,भाजपाच्या हर्षदा काकडे, बाजीराव गवारे, सेनेचे सदस्य दत्तात्रय सदाफुले, सभापती संदेश कार्ले, बाळासाहेब हराळ आणि अधिकारी उपस्थित होते. गुंड यांनी जिल्हा नियोजन समितीने जनसुविधा, तीर्थक्षेत्र विकास योजना, शाळा खोल्या, अंगणवाडीचा निधीत कपात होता काम नये, अशी भूमिका घेतली. काकडे यांनी गेल्या वर्षी टेंडर झालेल्या पाणी योजनाच्या कामांना मंजुरी द्यावी, अशी आग्रहाची मागणी केली. त्यावर नवाल यांनी केंद्र सरकारने या योजनांच्या कामाला स्थगिती दिली असल्याचे स्पष्ट केले. शेलार यांनी जनसुविधा योजनेत मंजूर निधीपेक्षा १ कोटी रुपये अधिक मिळावे, अशी मागणी केली. त्यावर गुंड यांनी जिल्ह्यात २१६ ग्रामपंचायतींना इमारती नसून त्यासाठी प्रत्येकी १२ लाख रुपये निधी मिळावा, अशी मागणी केली. काकडे यांनी प्रत्येक गावात स्मशानभूमी आणि ग्रामपंचायत इमारतीची सर्वाधिक मागणी असल्याचे स्पष्ट केले. या विषयावर सदस्यांनी एकत्र आले नाही तर यश येणार नाही, अशी एकीची हाक शेलार यांनी दिली. एकीकडे सरकार पाण्यावर खर्च करा, असा संदेश देत असून दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या पाणी योजनेचे १५ कोटी कपात केले. हा निधी जिल्हा परिषदेला द्या, जलयुक्तपेक्षा दर्जेदार कामे करून दाखवू, असे आवाहन शेलार यांनी यावेळी दिले. ...........