शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 20:22 IST

वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १८ - वादग्रस्त इस्लामिक प्रचारक झाकीर नाईक याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. मनी लाँडरिंग आणि दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याप्रकरणी चौकशीसाठी एनआयएसमोर उपस्थित न राहिल्याने त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला आहे. आरोप झाल्यापासून झाकीर नाईक हा भारताबाहेर आहे . याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने आदेश दिल्यानंतर मुंबईतील प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला आहे. 
झाकीर नाईचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी एनआयएने विनंती केल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भातील प्रक्रिया आठवडाभरापूर्वीच सुरू केली होती. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागळे यांनी सांगितले की, एनआयएने काही दिवसांपूर्वी झाकीर नाईकचा पासपोर्ट रद्द करण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.  अधिक वाचा(झाकीर नाईकविरोधात NIA कोर्टानं अजामीनपात्र अटक वॉरंट केलं जारी )( झाकीर नाईकच्या संस्थेच्या परदेशी देणग्या होणार बंद )(झाकीर नाईकला अटकेची भीती, वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं टाळलं )
गेल्या वर्षी बांगलादेशात ढाकातील उपाहारगृहात स्फोट झाल्यानंतर अटक केलेल्यांपैकी काहींनी नाईक यांच्या प्रवचनांवरून स्फूर्ती घेतल्याची कबुली दिली. यानंतर त्यांच्याविरुद्ध समाजात वितुष्ट निर्माण करणे याखेरीज बेकायदा कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला. याखेरीज केंद्र सरकारने स्वतंत्र कारवाई करून इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनवर बंदी घालून देणगी स्वीकारण्यास प्रतिबंध केला होता. 
एनआयएने १८ नोव्हेंबर २०१६ रोजी नाईकच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तसेच नाईकच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनलाही बेकायदेशीर घोषित करण्याता आले आहे. तसेच त्याचे एनजीओ आणि टीव्ही चॅनेलवरही बंदी घालण्यात आली आहे.