शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

झाकीर नाईकला अटकेची भीती, वडिलांच्या अंत्यसंस्काराला येणं टाळलं

By admin | Updated: October 31, 2016 10:52 IST

वडिलांचं निधन झाल्यानंतरही वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईकने अटकेच्या भीतीने भारतात येणं टाळलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 -  वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक डॉ. झाकीर नाईकचे वडील डॉ अब्दुल करीम नाईक यांच निधन झालं आहे. रविवारी सिटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र आपल्या वडिलांचं निधन झाल्यानंतरही झाकीर नाईकने अटकेच्या भीतीने भारतात येणं टाळलं असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. झाकीर नाईक सध्या मलेशियात असल्याची माहिती आहे. 
 
(परदेशातून झाकीर नाईकच्या बॅंक खात्यात 60 कोटींची रक्कम जमा)
(झाकीर नाईकपासून 55 दहशतवादी प्रेरित, तपासात खुलासा)
 
झाकीर नाईकच्या विरोधात नवा गुन्हा नोंद करण्यात आलेली नाही. मात्र त्याची संस्था इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनला (आयआरएफ) बेकायदेशीर घोषित करण्याची तयारी केंद्र सरकार करत आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत कडक धोरण स्वीकारले असून, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याची शिफारस केली आहे. 
झाकीर नाईक आणि त्याच्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनबाबत गृहमंत्रालयाने एक पत्रक तयार केले आहे. या पत्रकातून झाकीर नाईक आणि त्याच्या संस्थेवर कारवाई करण्याची शिफारस गृहमंत्रालयाने केली आहे. 
 
 
 
झाकीर नाईकची भाषणेही गृहमंत्रालयाच्या रडारवर आहेत. त्याची भाषणे अत्यंत प्रक्षोभक असून, आपल्या भाषणांमधून तो विविध धार्मिक समुहांमध्ये तेढ निर्माण करत असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.  
 
बांगलादेशमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील दहशतवादी झाकीरच्या भाषणामधून प्रेरित झाल्याचा आरोप आहे. तसेच  कट्टर विचारांमुळे ब्रिटन, कॅनडा, मलेशिया या देशांनी झाकीर नाईकला त्यांच्या देशात येण्यास बंदी घातली आहे.