शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

युवतीने फोडला पोलिसाचा मोबाईल दुचाकीवर कारवाईवरून संताप : दोघांना अटक

By admin | Updated: December 8, 2015 00:03 IST

जळगाव- विना चालक परवाना दुचाकी नेत असतानाच ती वाहतुकीस अडथळा ठरल्याने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याने कारवाई केल्याने धरणगाव येथील युवतीने संबंधित कर्मचार्‍याचा मोबाईल फोडला. तसेच संबंधित कर्मचार्‍यास अर्वाच्च भाषाही वापरली. या प्रकरणी संबंधित युवतीसह तिच्यासोबतच्या एका युवकास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुवर्णा हरिहर पाटील व संतोष पाटील दोघे रा.धरणगाव, असे आरोपींचे नाव आहे.

जळगाव- विना चालक परवाना दुचाकी नेत असतानाच ती वाहतुकीस अडथळा ठरल्याने शहर वाहतूक शाखेच्या कर्मचार्‍याने कारवाई केल्याने धरणगाव येथील युवतीने संबंधित कर्मचार्‍याचा मोबाईल फोडला. तसेच संबंधित कर्मचार्‍यास अर्वाच्च भाषाही वापरली. या प्रकरणी संबंधित युवतीसह तिच्यासोबतच्या एका युवकास जिल्हा पेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुवर्णा हरिहर पाटील व संतोष पाटील दोघे रा.धरणगाव, असे आरोपींचे नाव आहे.

यासंदर्भात जिल्हा पेठ पोलिसात युवती व युवकावर गुन्हा दाखल झाला आहे. नवीन बसस्थानकासमोर सोमवारी दुपारी हा प्रकार घडला.
बसला दुचाकीचा अडथळा
संतोष पाटील व सुवर्णा पाटील हे दुचाकीने (क्र.एमएच १९ वाय ५९९०) नवीन बसस्थानकाकडून जात होते. त्यांची दुचाकी बसस्थानकातून बाहेर येणार्‍या बसना अडथळा ठरत होती. या दरम्यान शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी प्रकाश भागवत पाटील हे या भागात नियुक्तीस होते. त्यांनी दुचाकीस्वार पाटील यांना दुचाकी पुढे नेण्यास सांगितले. या दरम्यान दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. वाद एवढा झाला की हमरीतुमरीपर्यंत प्रकार घडला. अशातच दुचाकीवर असलेल्या सुवर्णा पाटील हिने संतापात प्रकाश पाटील यांचा स्मार्ट फोन (मोबाईल) धरून तो आपटला. त्यात त्याचे नुकसान झाले.

दुचाकी वाहतूक शाखेत सोडली
संतोष पाटील व सुवर्णा पाटील यांची दुचाकी शहर वाहतूक शाखेच्या कार्यालयात आणण्यात आली. ती पाटील यांनी तेथे सोडली. नंतर जिल्हापेठ पोलिसांनी दुचाकी ताब्यात घेतली. पोलीस कर्मचार्‍याशी असभ्य वर्तन आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी सुवर्णा पाटील व संतोष पाटील यांना अटक करण्यात आली असून, ते जिल्हा पेठ पोलिसांच्या कोठडीत आहेत. प्रकाश पाटील यांच्या फिर्यादीनुसार दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे.