शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

भिमा नदीत युवक बुडाला

By admin | Updated: July 12, 2015 21:58 IST

वाडा (जि. पुणे): आव्हाट-गोरेगाव (ता. खेड) जवळ भिमा नदी पात्रात दोन युवक बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यास यश आले आहे. बुडालेल्या पवन राजेंद्र गांगड (वय २५) याचा मृतदेह आज सायंकाळी सापडला.

वाडा (जि. पुणे): आव्हाट-गोरेगाव (ता. खेड) जवळ भिमा नदी पात्रात दोन युवक बुडाले त्यापैकी एकाला वाचवण्यास यश आले आहे. बुडालेल्या पवन राजेंद्र गांगड (वय २५) याचा मृतदेह आज सायंकाळी सापडला.
खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अश्विन पाटील (रा.हडपसर, सार्थक मंडगे रा.परभणी) सुजित नायर (रा.केरळ) पवन राजेंद्र गांगड (वय २५ सध्या रा.विश्रांतवाडी, पुणे. मूळगाव भोईरे गांगर्डे, ता. पारनेर जि. अहमदनगर) हे चौघे शनिवारी भिमाशंकर येथे जाण्यास निघाले मात्र ते भिमाशंकरला जात असताना आव्हाट गोरेगाव येथे भिमा नदी किनारी थांबले
तेथे पवन हा पोहण्यासाठी नदीत उतरला. तो मध्यावर गेला असता बुडू लागला. अश्विन पाटील याने त्याला वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारली. मात्र दोघेही बुडू लागले. हे पाहून सोबत असलेले दोघेही घाबरले. त्यांनी आरडाओरडा केला. गोरेगावचे माजी सरपंच सीताराम महादु गवारी (वय ६५) यांनी जिवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली. त्यांनी अश्विन पाटील याला वाचविले. पवन गांगड याला वाचवू शकले नाही. त्यांनी अश्विन याला आपल्या घरी आणले. त्याच्या पोटातील पाणी काढले. काही वेळाने तो शुध्दीवर आला. त्याला खेड येथे दवाखाण्यात हलविण्यात आले.