शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी मदत देऊनही तरुणाचे प्राण गेलेच!

By admin | Updated: July 5, 2015 04:29 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने

वाराणसी: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातील एका ३३ वर्षांच्या दलित तरुणावर मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) पाच महिन्यांपूर्वी तत्परतेने आर्थिक मदत देऊनही लखनौच्या सरकारी इस्पितळात अशा शस्त्रक्रियांसाठी मोठी प्रतीक्षायादी असल्याने या तरुणाचा बुधवारी शस्त्रक्रियेअभावी दुर्दैवी मृत्यू झाला.वाराणसीच्या रोहानिया भागात राहणाऱ्या संतोषकुमार या तरुणाची दोन्ही मूत्रपिंडे निकामी झाल्याचे निदान डॉक्टरांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केल्यापासून लखनौ येथील संजय गांधी पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसमध्ये वेळोवेळी डायलिसिस केले जात होते. संतोषकुमारला वाचविण्यासाठी डॉक्टरांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला व त्यासाठी ४.३७ लाख रुपये खर्च सांगितला. एवढे पैसे उभे करणे अशक्य असल्याने रिटा हिने पंतप्रधान मोदींच्या वाराणसी जनसंपर्क कार्यालयाचे प्रमुख शिवशरण पाठक यांच्याशी संपर्क साधला. त्याचा उपयोग झाला व गेल्या फेब्रुवारीत पंतप्रधान कार्यालायने संतोषकुमारवरील शस्त्रक्रियेसाठी २.१७ लाख रुपयांची रक्कम संजय गांधी इस्पितळात जमाही केली. भाजपाचे विधान परिषद सदस्य लक्ष्मण वापपेयी यांनी त्यांच्या आमदार निधीतून बाकीची रक्कम देण्याचे वचन दिले होते.संजय गांधी इस्पितळात मोठी वेटिंग लिस्ट आहे व तोपर्यंत संतोषकुमारची शस्त्रक्रिया लांबविणे इष्ट नाही हे लक्षात घेऊन, या इस्पितळाच्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ही शस्त्रक्रिया किंग एडवर्ड मेडिकल युनिव्हर्सिटीच्या इस्पितळात करण्याची सूचना, संजय गांधी इस्पितळाचे संचालक प्रा. राकेश कपूर यांनी मध्यंतरी केली होती. यास दुजोरा देताना किंग एडवर्डचे कुलगुरु रविकांत यांनी सांगितले की, कपूर १ जुलै रोजी या संदर्भात माझ्याशी बोलले होते. परंतु मी त्यांना सांगितले की, आम्ही शस्त्रक्रियेसाठी फक्त आॅपरेशन थिएटर उपलब्ध करून देऊ पण पुढील उपचार नेफ्रॉलॉजिस्टच्या देखरेखीखाली करणे गरजेचे असल्याने रुग्णाला नंतर संजय गांधीमध्ये हलवावे लागेल. त्यानंतर कपूर यांच्याकडून काही उत्तर आले नाही, असेही रविकांत म्हणाले. (वृत्तसंस्था)सामान्य माणसाच्या आजारपणाचे गांभीर्य राजकारणी व संजय गांधी इस्पितळाच्या प्रशासनाने लक्षात न घेतल्यानेच माझ्या भावाला प्राण गमवावे लागले. -रिचा, संतोषकुमारची बहीण