युवक शिबीर लातूर - राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबीर रमजानपूर येथे सुरु आहे़ या शिबीराचे उद्घाटन आ़ॲड़त्रिंबक भिसे
By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST
ग्रंथपालांची बैठक लातूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय ग्रंथपालांची विविध मागण्यांसाठी १९ फेब्रुवारी रोजी टाऊन हॉल येथे बैठक होणार आहे़ जिल्ात अनेक ठिकाणी ग्रंथपाल अतिरिक्त झाले आहेत, या अनुषंगाने बैठकीत चर्चा होईल़ दरम्यान, शाळा ग्रंथपाल संघाने शिक्षण उपसंचालकांना सोमवारी विविध मागण्यांचे निवेदन दिले़कत्तलखान्यांची मागणी लातूर - प्रत्येक जिल्हा ...
युवक शिबीर लातूर - राजर्षी शाहू महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबीर रमजानपूर येथे सुरु आहे़ या शिबीराचे उद्घाटन आ़ॲड़त्रिंबक भिसे
ग्रंथपालांची बैठक लातूर - माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शालेय ग्रंथपालांची विविध मागण्यांसाठी १९ फेब्रुवारी रोजी टाऊन हॉल येथे बैठक होणार आहे़ जिल्ात अनेक ठिकाणी ग्रंथपाल अतिरिक्त झाले आहेत, या अनुषंगाने बैठकीत चर्चा होईल़ दरम्यान, शाळा ग्रंथपाल संघाने शिक्षण उपसंचालकांना सोमवारी विविध मागण्यांचे निवेदन दिले़कत्तलखान्यांची मागणी लातूर - प्रत्येक जिल्हा व तालुका स्तरावर कत्तलखाने स्थापन करावेत, अशी मागणी लातूर जिल्हा जमेयतूल कुरेशी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली़ कुरेशी समाजाच्या विविध मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक अश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले असल्याचेही अफजल कुरेशी यांनी केले़ नागुरे यांची निवडलातूर - शिवराजष्ट्र सेवा संघाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी वर्षा नागुरे यांची निवड करण्यात आली़ डॉ़ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या हस्ते त्यांना मंगळवारी नियुक्तीपत्र देण्यात आले़ यावेळी ॲड़ निलेश करमुडी यांची उपस्थिती होती़ वार्षिक स्नेहसंमेलनलातूर - श्री शंभुलिंग शिवाचार्य प्राथमिक विद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी झाले़ यावेळी सरस्वती बोरगावकर यांचा सत्कार करण्यात आला़ शिक्षण विस्तार अधिकारी डी़डी़ पोतदार, सुरमणी बाबुराव बोरगावकर, आऱबी़कुलकर्णी, मुख्याध्यापक योगीराज स्वामी, अविनाश घुगे यांची उपस्थिती होती़ पेन्शनची मागणी लातूर - मनपातील सेवानिवृत्त कर्मचार्यांना थमित वेतन व पेन्शन देण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे सोमवारी कर्मचार्यांच्या वतीने करण्यात आली़ मनपात अनेक वर्षे सेवा करुन थकित व सेवानिवृत्ती वेतन मिळत नसल्याचे या निवेदनात शेख गफार यांनी म्हटले आहे़ स्नेहसंमेलन उत्साहात लातूर - खाडगाव रोड येथील ईरा किड्स ए प्ले स्कुलचे वार्षिक स्नेहसंमेलन सोमवारी उत्साहात झाले़ दयानंद महाविद्यालयाच्या सभागृहात विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे सादरीकरण केले़ यावेळी सतीष गोरे, दत्तमहाराज रुईकर, डॉ़ गणपतराव मोरे यांची उपस्थिती होती़ भारत विद्यालयात कार्यक्रमलातूर - लातूर शहरातील लेबर कॉलनी येथील भारत प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात स्वयशासन दिन साजरा करण्यात आला़ मुख्याध्यापक म्हणून शेख समिना झांगीर हिने तर उपमुख्याध्यापक म्हणून अशपाक शेख यांनी काम पाहिले़ विशाल कांबळे, उबेद शेख, सिद्धेश्वर पोवाडे, सुरज भोसले, रफीक शेख, प्रित्येश मारोपवार, अनुराधा फुलगुंडे यांनी शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली़