विदेशी तरुण-तरुणीने खोलीची मागणी केली होती उमवि अत्याचार प्रकरण : हॉटेल शालिमारच्या वेटरची साक्ष
By admin | Updated: March 18, 2016 00:14 IST
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा विदेशींनी एका खोलीची मागणी केल्याचे सांगितले, दरम्यान, लोखंडे याने दोन्ही आरोपींना न्यायालयात ओळखले.
विदेशी तरुण-तरुणीने खोलीची मागणी केली होती उमवि अत्याचार प्रकरण : हॉटेल शालिमारच्या वेटरची साक्ष
जळगाव: उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील अत्याचार प्रकरणात गुरुवारी न्या.एस. के.कुळकर्णी यांच्या न्यायालयात हॉटेल शालिमारचा वेटर बबनराव संतोष लोखंडे याची साक्ष नोंदविण्यात आली. ३ ऑगस्ट २०१४ रोजी विदेशी मुलगी व मुलगा हे एका मुलीला घेऊन हॉटेलमध्ये आले होते. तेव्हा विदेशींनी एका खोलीची मागणी केल्याचे सांगितले, दरम्यान, लोखंडे याने दोन्ही आरोपींना न्यायालयात ओळखले.हॉटेलमध्ये दोघं विदेशी तरुण-तरुणींसह आपल्याकडील २ ते ४ जण नेहमीच जेवायला यायचे. विदेशी इंग्रजीत तर आपल्याकडील मुले मराठीत बोलायचे. ३ ऑगस्ट २०१४ रोजी दोघं विदेशी एका मुलीला घेऊन आले. जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना मीच सर्व्हीस दिली.यावेळी विदेशी तरुणीने दारुची मागणी केली होती, परंतु मी दारू दिली नाही. कारण महाराष्ट्रीयन मुलीने त्यास विरोध केला होता. जेवण झाल्यानंतर बाहेर जात असताना महाराष्ट्रीयन मुलीला ते विदेशी आहेत, त्यांच्यासोबत तू राहू नकोस असे सांगितले होते.नंतर ते रिक्षाने निघून गेले. यावेळी दोन्ही आरोपींना त्यांनी ओळखले. आरोपीचे वकील अकील इस्माईल यांनी लोखंडी याची उलटतपासणी घेतली. संशयितांनी एकांतासाठी हॉटेलमध्ये खोली मागितली होती का? असे विचारले असता त्याने होकार दिला. ग्राहकांना दिल्या जाणार्या बिलात वेटरचे नाव असते, हे त्याने नाकारले. सरकारतर्फे ॲड.गोपाळ जळमकर यांनी काम पाहिले.२३ मार्च रोजी पुढील कामकाज होणार आहे.