शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅलेंटाईन्स डे साजरा करणा-या तरुणाला इमारतीवरुन फेकून दिले

By admin | Updated: February 15, 2016 10:15 IST

मैत्रिणीसोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला गेलेल्या २७ वर्षीय तरुणाला बहुमजली इमारतीवरुन फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरगावमध्ये घडली आहे.

ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. १५ - फेसबुकवरच्या मैत्रिणीसोबत व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायला गेलेल्या २७ वर्षीय तरुणाला बहुमजली इमारतीवरुन फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरगावमध्ये घडली आहे. ईश्वर असे या युवकाचे नाव असून, तो मूळचा दिल्लीचा आहे.  
रविवारी रात्री ही घटना घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ईश्वरचा मृत्यू झाला. मागच्या सात महिन्यांपासून ईश्वर फेसबुकवरुन तरुणीच्या संपर्कात होता. दोघांनी गुरगावमध्ये एकत्र व्हॅलेंटाईन्स डे साजरा करायचा ठरवला होता. त्यानुसार तरुणीला तो हुडा सिटी सेंटर येथे भेटला. 
त्यानंतर दोघे गुरगावमधील पॉश वस्ती असलेल्या सुशांत लोक परिसरात गेले. ही तरुणी तिथे रहाते. ईश्वर आणि तरुणी तिच्या फ्लॅटवर जाऊन बसले होते. इतक्यात तरुणीचा भाऊ रमेश आणि ड्रायव्हर अनिल कुमार तिथे आला. 
ईश्वरला तिथे पाहून रमेश संतापला. रमेश आणि अनिलने मिळून आधी ईश्वरला बेदम मारहाण केली. त्यानंतर घराच्या खिडकीतून खाली टाकून दिले. दोघांच्या विरोधात सुशांत लोक पोलिस स्थानकात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे. ईश्वरचा जागीच मृत्यू झाला नव्हता. आरोपींनी त्याला गाडीत टाकून खांडसा रोडवर नेले. तिथे रस्त्यावर फेकले जेणेकरुन रस्ते अपघातामध्ये मृत्यू झाल्याचे प्रकरण दाखल व्हावे.