अपघातात तरुण ठार
By admin | Updated: August 31, 2015 21:30 IST
ट्रक अपघातात तरुण ठार
अपघातात तरुण ठार
ट्रक अपघातात तरुण ठारवाडी : भरधाव मोटरसायकल ट्रकवर आदळून तरुण ठार झाला. तर मोटरसायकलवर बसलेला तरुण जखमी झाला. हा अपघात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेट्रोलपंप समोर रविवारी रात्री ११.५० वाजताच्या सुमारास झाला. एमएच-३१/एझेड-८२९३ क्रमांकाच्या मोटरसायकलने दोन तरुण जात होते. दरम्यान पेट्रोलपंपच्या बाजूला उभ्या असलेल्या केए-१४/बी-३३७५ क्रमांकाच्या ट्रकवर मोटरसायकल आदळली. त्यात मोटरसायकल चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मागे बसलेला तरुण जखमी झाला. दोघांचीही ओळख पटू शकली नाही. अपघाताची माहिती मिळताच वाडीचे पोलीस उपनिरीक्षक भास्कर हे घटनास्थळी दाखल झाले. जखमींना लगेच मेयो हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. याप्रकरणी वाडी पोलिसांनी भादंविच्या कलम २७९, ३३७, ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू झाला. (प्रतिनिधी)