शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

आपण स्वत: हून भितीत जगतो

By admin | Updated: March 15, 2016 00:34 IST

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मंजुळे म्हणाले, आपण प्रश्न विचारत नाही. आपल्याला प्रश्न पडले पाहिजेत. राजकारणी, शिक्षक, विचारवंत यांना आपण प्रश्न विचारले पाहीजेत. हल्ली राजकारणी तर स्वत: ला समाजसेवकच समजत नाहीत. आपल्याकडे राजकारणी ठरवतील तीच कामे होतात. इतर देशांमध्ये म्हणजे जर्मनीत कुठले काम हाती घ्यायचे असेल तरी त्यावर मतदान घेतले जाते. हे असे व्हायला हवे. आपण भीतीच्या वातावरणात जगतो. घरात देवांच्या प्रतिमा लावतो... आणि घरात आपणच भीतीच्या वातावरणात जगतो... मग कशाला त्या प्रतिमा लावायच्या. हे करायचे... देवाचे दर्शन घ्यायचे.., असे पालक आपल्या पाल्यांना लहानपणापासूनच सांगतात. चौकटी बांधून ठेवतात.

मी जळगावात त्या मुलीच्या लग्नाला नक्की येईन?
मुली लग्न करून सासरी जातात. नंतर त्यांचे लग्न मोडल्यावर त्यांना घर नसते. बहिणाबाईंनी हे वास्तव आपल्या कवितेतून मांडले. तरी अजूनही परिवर्तन झाले नाही. मुली आपले घर बांधून नवरा आपल्या घरात केव्हा आणतील. जळगावातील एक मुलगी मला भेटली होती. तिने आपले स्वत:चे घर बांधून घरात नवरा आणायचा असे ठरविले आहे. मी तिच्या लग्नाला नक्की येईल... व तिच्या घरालाही भेट देईन. स्त्रिया धर्म, कर्मकांड, चाकोरीत अडकलेल्या दिसतात. यातून त्या केव्हा बाहेर पडणार, असा प्रश्नही मंजुळे यांनी उपस्थित केला.

प्रेम करताना विचार करू नका...
सौंदर्य दिसण्यावर नसते. ते असण्यावर असते. कुरूप म्हणजे वाईट, अशी मानसिकता आहे. पण अनेक कुरूप मुली यशस्वी, कौशल्यवान आहेत. प्रेम करा, प्रेम करण्यापासून कुणाला अडवू नका, जात पात पाहू नका... पण एकतर्फी प्रेम करू नका... अलीकडे अनेक मुली प्रेम करताना आडनाव, जात, शिक्षण हे तपासून घेतात. असे करून प्रेम होत नाही.., असेही मंजुळे गमतीने म्हणाले.

दोन वेळच्या जेवणासाठी काम
अनेकजण जे काम करतात ते आवडीने, मनापासून करतात, असे नाही. आपल्याला व्यवस्थित जगता यावे, दोन वेळचे जेवण, हा विचार असतो. श्रमाला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, असेही मंजुळे यांनी सांगितले.