शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

आप सरकार अपयशी ठरविण्याचा डाव -केजरीवाल

By admin | Updated: May 18, 2015 02:46 IST

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग

नवी दिल्ली : राष्ट्रीय राजधानी दिल्लीत हंगामी मुख्य सचिवांच्या नियुक्तीवरून आम आदमी पार्टीचे (आप) सरकार व दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्यात खुले युद्ध छेडले असतानाच, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रविवारी या मुद्यावरून मोदी सरकारला लक्ष्य केले. आमचे सरकार अपयशी ठरावे, यासाठी सर्व प्रकारचे डावपेच आखले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. दिल्लीच्या बुरांडी येथे एका सभेत केजरीवाल बोलत होते. सरकारची मनाई धुडकावून ज्येष्ठ सनदी अधिकारी शकुंतला गामलीन यांनी हंगामी मुख्य सचिवपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर केजरीवाल या मुद्यावर उघडपणे समोर आले. आम्ही गामलीन यांच्या नियुक्तीला विरोध केला; मात्र आमचा विरोध डावलून गामलीन यांची हंगामी मुख्य सचिवपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती मोदी सरकारच्या हेतूंबाबत संशय निर्माण करणारी आहे; पण मी गामलीन यांच्यावर नजर ठेवेल. आमचे सरकार सत्तेवर आले तेव्हा गामलीन एका पत्रावर स्वाक्षरी घेण्यासाठी आमच्या ऊर्जामंत्र्यांकडे आल्या होत्या. रिलायन्स मालकीच्या वीज कंपन्यांनी ११ हजार कोटी रुपयांच्या कर्जासाठी अर्ज केला आहे, असे त्यांनी आमच्या मंत्र्यांना सांगितले होते. संबंधित पत्रावर स्वाक्षरी करा. ही केवळ औपचारिकता आहे, असे त्या म्हणाल्या होत्या; पण जेव्हा आमच्या ऊर्जामंत्र्यांनी या पत्राची शहानिशा केली तेव्हा ते हमीपत्र निघाले. रिलायन्सच्या मालकीच्या कंपन्या कर्ज फेडण्यात अपयशी ठरल्या असत्या तर तो भुर्दंड दिल्लीच्या जनतेवर पडला असता आणि दिल्लीतील वीजदर दुप्पट-तिप्पट महागले असते, असा दावाही केजरीवाल यांनी केला.(लोकमत न्यूज नेटवर्क)