शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

आपने दिल्लीवासियांच्या पाठीत खंजीर खुपसला - नरेंद्र मोदी

By admin | Updated: January 31, 2015 19:24 IST

गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलंत त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यामुळे दिल्लीचे एक वर्ष वाया गेले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला.

 
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३१ -  गेल्या वर्षी तुम्ही ज्यांना गादीवर बसवलंत त्यांनी तुमच्या पाठीत खंजीर खुपसला, त्यांच्यामुळे दिल्लीचे एक वर्ष वाया गेले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवला. 'आप'ला मत देऊन दिल्लीकरांनी पुन्हा चूक करू नये असे आवाहनही त्यांनी केले. दिल्लीला स्थिर सरकार आणि अनुभवी मुख्यमंत्री हव्या आहेत, असे सांगत दिल्लीवासियांनी भाजपला बहुमताने जिंकून द्यावे असेही ते म्हणाले. दिल्ली विधानसभा निवडणूक अवघी आठवड्यावर आली असून प्रचारासाठी अवघे चार दिवस उरले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी जाहीर सभा घेत अरविंद केजरीवाल व आपवर कडाडून हल्ला चढवला. 
लोकसभा निवडणुकीत 'आप'ला मार खावा लागला, त्यांनी सर्वाधिक जागांवर डिपॉझिट जप्त होण्याचा विक्रम नोंदवला आहे, असे असतानाही ते मतं मागत आहेत, अशा शब्दांत त्यांनी आपची खिल्ली उडवली. खोट बोलून एकदा यश मिळतं, वारंवार नाही असा टोलाही त्यांनी लगावला.
दिल्लीकरांनी मला बोलावलं म्हणून मी आज इथे आहे, पण मी खुर्चीत बसण्यासाठी नव्हे तर लोकांची सेवा करण्यासाठी आलो आहे, असेही ते  म्हणाले. 
यावेळी त्यांनी भाजपाच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार किरण बेदींचे कौतुक करत त्यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. बेदींना दिल्लीची चांगली माहिती आहे, त्यांना प्रशासनाचाही चांगला अनुभव आहे, त्यामुळे त्या दिल्लीला वेगळ्या उंचीवर नेतील, असा विश्वासही त्यांनी सभेत व्यक्त केला.